मारेकऱ्याला पकडण्यासाठी बनाव

By Admin | Published: December 15, 2014 10:17 PM2014-12-15T22:17:09+5:302014-12-16T00:14:52+5:30

शिक्षक संघटनेचा आरोप : पोलीस ठाण्यातच आंदोलन करणार

Make the killer catch | मारेकऱ्याला पकडण्यासाठी बनाव

मारेकऱ्याला पकडण्यासाठी बनाव

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस प्रशासनाचा कारभार पोखरला गेला असून मारेकऱ्यांना पकडण्यासाठी बनवाबनवी पोलीस करीत आहेत. चार दिवसांपूर्वी सुबोध वराडकर यांना मारहाण केलेल्या मारेकऱ्याचा येत्या दोन दिवसात छडा न लावल्यास शनिवारी मोर्चा काढून मारेकऱ्याला पकडेपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनेचे कोकण परिषदेचे विभाग अध्यक्ष सुधाकर तावडे यांनी दिला.
चार दिवसांपूर्वी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षक सुबोध वराडकर यांना शाळेच्या आवारात येऊन दिनेश जाधव याने मारहाण केली होती. याप्रकरणी सोमवारी शाळेच्या सभागृहात झालेल्या निषेध सभेत तावडे बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत काटे, शिक्षक सचिन तकिलदार, दिगंबर पावसकर, विलास कासकर, संजय बांगर, अजयकुमार बेकनाळकर, वाय. पी. नाईक, एम. पी. मानकर, तृप्ती पार्सेकर, मनीषा कदम आदी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कळसुलकर शाळेतील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चार दिवसांपूर्वी सुबोध वराडकर यांच्या बाबतीत गैरवर्तन केले होते. याचा जाब त्यांनी त्या विद्यार्थ्यास विचारला होता. तर विद्यार्थ्याने शिक्षकांनी आपणास मारहाण केली असून आता उलट्या होत असल्याचे पालकांना सांगितले होते. त्यामुळे दिनेश जाधव याने सुबोध वराडकर यांना शाळेच्या आवारात येऊन मारहाण केली होती. या प्रकरणी शिक्षकांनी जाधव याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध का लावत नाहीत, असा प्रश्न तावडे यांनी केला.
यावेळी तावडे म्हणाले, पोलीस एका दिवसात जाधवचा शोध घेऊ शकतात. परंतु पोलिसांचा कारभार पोखरला गेला असल्याचे सांगून तावडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षक हा शासनाचा कर्मचारी असून पोलीसही शासनाचेच कर्मचारी आहेत. परंतु शासनाचे एक खाते दुसऱ्या खात्याला मदत करीत नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे शिक्षक पेशा खवळल्यास काय करू शकतो, ते मोर्चातून दाखवून देण्यात येईल, असा इशारा यावेळी तावडे यांनी दिला. शिक्षण परिषदेची स्थापना ही कळसूलकर इंग्लिश स्कूल या शाळेतूनच झाली आहे. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. कायदा हातात घेऊन शिक्षकाला अमानुषपणे मारहाण होते, ही घटना निषेधास्पद असल्याचे तावडे यांनी सांगितले.
मुख्याध्यापक चंद्रकांत काटे म्हणाले, शिक्षकाला मारहाण काळीमा फासणारी गोष्ट आहे. घटनेची दखल घेऊन सुधीर वराडकर यांना पाठबळ दिल्याबाबत त्यांनी शिक्षक संघटनेचे आभार मानले. शिक्षकांनी मारहाण झाल्यावर मारेकऱ्यांच्या दडपणाखाली न राहता त्यांच्या विरोधात तक्रार करणे आवश्यक आहे. त्याचे समर्थन न करता वेळीच सावध राहणे गरजेचे असल्याचे सलीम तकीलदार यांनी
सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Make the killer catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.