सावंतवाडीत भरा घरबसल्या कर

By admin | Published: October 2, 2016 11:29 PM2016-10-02T23:29:27+5:302016-10-02T23:29:27+5:30

वेबसाईटचे उद्घाटन : सावंतवाडी शहराच्या परिपूर्ण माहितीचाही समावेश

Make a living in Sawantwadi | सावंतवाडीत भरा घरबसल्या कर

सावंतवाडीत भरा घरबसल्या कर

Next

 
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या वेबसाईटचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेबसाईटद्वारे नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन पद्धतीने घरपट्टीसारखे कर भरता येणार आहेत. शनिवारी ई-गव्हर्नर्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
येथील नगरपरिषेच्या लोकमान्य टिळक सभागृहात या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक संजय पेडणेकर, विलास जाधव, देवेंद्र टेमकर, नगरसेविका अफरोज राजगुरू, कीर्ती बोंद्र्रे, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, योगिता मिशाळ, साक्षी कुडतरकर, क्षिप्रा सावंत, आदी उपस्थित होते. ‘२ं६ंल्ल३६ं्िरू्र३८.ङ्म१ॅ’ या वेबसाईटचे अनावरण करताना नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले की, सावंतवाडी नगरपरिषद आॅनलाईन करण्यासाठी २०१२ सालापासून नगरपरिषद कार्यरत आहे.
यामध्ये सावंतवाडी शहराच्या परिपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.ही सुविधा उपलब्ध करून देणारी सावंतवाडी ही जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद असून, घरपट्टी कोठूनही आणि कधीही भरता येणार आहे. तसेच आॅनलाईन पेमेंट गेटवेमार्फत घरपट्टी भरून घरच्या घरी पावती मिळणार आहे, अशी माहिती साळगावकर यांनी दिली
यामध्ये नागरिकांना घरपट्टी आॅनलाईन पेमेंट गेटवेमार्फत भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तसेच सावंतवाडी शहराची माहिती, शहराचा इतिहास, पर्यटनाची माहिती, नगरपरिषदेचे विविध कार्यक्रम, प्रोजेक्टस् यांची माहिती, नागरिकांना आवश्यक अर्ज नमुने, निविदा यांची आॅनलाईन माहिती, जन्म-मृत्यूच्या नोंदणी आॅनलाईन पाहता येणार असून, नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी आॅनलाईन बघण्याची सुविधा तसेच इतर सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
याचबरोबर सावंतवाडी नगरपरिषद लवकरच १८००२३३२०४७ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करणार आहे.
त्यामुळे नागरिकांना आपली कामे सोयीस्करपणे करता येणार असल्याचेही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. ही वेबसाईट सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रथमेश कसालकर यांनी तयार केली असून, भविष्यात नगरपरिषदेचा मोबाईल अ‍ॅप तयार करणार असल्याची माहिती कसालकर यांनी दिली.
दरम्यान सावंतवाडी नगरपरिषदेच्या दवाखान्यात भगवान महावीर यांच्या छायाचित्राचे अनावरण सुवर्णा मुढाळे यांच्या हस्ते करण्यात आले. बॅ. नाथ पै सभागृहाच्या गॅलरीमध्ये नाट्यकर्मी कै. दिनकर धारणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण त्यांच्या पत्नी उषा धारणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Web Title: Make a living in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.