मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:08 PM2024-09-21T13:08:24+5:302024-09-21T13:09:18+5:30

गस्ती नौका पोहचली.. मात्र जाळी कापून हायस्पीड पळाले 

Malpi high speed boats ply on Malvan coast Robbery of fish damage to fishermen nets | मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान

मालवण किनारपट्टीवर मलपी हायस्पीड बोटींचा धुमाकूळ; मासळीची लूट, मच्छिमारांच्या जाळ्यांचे केलं नुकसान

मालवण : मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे. मोठया संख्येने या बोटी अगदी १० वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत. मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहे. 

याबाबत स्थानिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाचे वारंवार लक्ष वेधल्या नंतर शितल ही गस्ती नौका कार्यान्वित करून मत्स्य परवाना अधिकारी भालेकर व पोलीस कर्मचारी लुडबे व टीम अशी संयुक्त गस्त शुक्रवारी करण्यात आली. देवबाग तारकर्ली समोर सुमारे १४ वाव खोल समुद्रात जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या सुमारे ३० पेक्षा जास्त हायस्पीड बोटिंच्या जवळ गस्ती नौका येत असल्याचे पाहून हायस्पीड बो्टींनी पळ काढला. समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली जाळी कापून कारवाईच्या भीतीने  हायस्पीड बोटी पळाल्या. 

त्या हायस्पीड नौकांची कापलेली जाळी मत्स्य परवाना अधिकारी भालेकर यांनी जप्त केली आहेत.  तसेच गस्ती नौकेच्या माध्यमातून कारवाई अशीच सुरु राहील असे स्पष्ट केले.

Web Title: Malpi high speed boats ply on Malvan coast Robbery of fish damage to fishermen nets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.