'मालवण-कसाल'साठी २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर, आमदारांनी पाळला शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:53 PM2019-02-04T17:53:10+5:302019-02-04T17:54:12+5:30
आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे मालवणपासून कसालपर्यंतचा मार्ग 'खड्ड्यां'पासून मुक्त होणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
मालवण : आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे मालवणपासून कसालपर्यंतचा मार्ग 'खड्ड्यां'पासून मुक्त होणार आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
मालवण दौ?्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर अध्यक्ष बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, आरोग्य सभापती पंकज साधये, यशवंत गावकर आदी उपस्थित होते. मालवण-कसाल राज्यमागार्ची अनेक ठिकाणी अक्षरश: चाळण झाली होती. याबाबत सर्वसामान्य तसेच वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. यावेळी आमदार नाईक यांनी मालवणवासीयांना दिलेल्या शब्दनुसार रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ७० लाखाचा निधी मंजूर केला आहे.
मालवण नगरपरिषदेच्या शतक महोत्सवात आमदार वैभव नाईक यांनी मालवणवासीयांना संबोधित करताना मालवण-कसाल रस्तावरील खड्ड्यांची समस्या निवडणुकीआधी मार्गी लावेन, असे अभिवचन दिले होते. आमदार नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आश्वासन दिल्याच्या पाचव्या दिवशी निधीला मंजुरी मिळाली आहे. येत्या आठवड्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ 'कार्पेट' डांबरीकरण केले जाणार आहे. याबाबत नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी रस्त्याच्या कामाची सुरुवात मालवणपासून केली जावी, अशी सूचना आमदारांकडे मांडली.
मालवण शहराला जोडणारा मालवण-कसाल राज्यमार्ग हा महत्वपुर्ण मानला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या मागार्ची पूर्णत: वाताहत झाली होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर कार्यवाही करण्यासाठी गतवर्षी सुमारे २१ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला होता. मात्र खड्ड्यांची झालेली चाळण पाहता निधी अपुरा पडत होता. याबाबत आमदार नाईक यांनी पाठपुरावा करून नव्याने २ कोटी ७० लाखाचा निधी आणला आहे.
त्या ठेकेदाराकडे राहणार देखभाल दुरुस्तीची जबाबदारी
राज्यमार्गाच्या डांबरीकरणासाठी नव्याने २ कोटी मंजूर झाले असले तरी या मागार्ची देखभाल दुरुस्तीचा घेतलेल्या ठेकेदाराला आपल्या नियोजित कामांची पूर्तता करावी लागणार आहे. मार्गावरील धोकायदायक ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असल्याने खड्डे बुजविण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून खड्डे बुजविणे, झाडी तोडणे तसेच साईडपट्टी सुस्थितीत करण्याबाबत देण्यात आलेली जबाबदारी कायम असेल, असे आमदार नाईक यांनी सांगितले.
वाहतुकीस धोकादायक ठिकाणे
मालवण देऊळवाडा, आनंदव्हाळ पूल, चौके, साळेल, कुणकवळे, कट्टा, सावरवाड, रानबांबुळी
याठिकाणी रस्ता वाहतुकीस अतिधोकादायक बनला आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हॉटमिक्स डांबरीकरण प्राधान्याने याठिकाणी होणे आवश्यक आहे.