Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:20 PM2024-10-02T13:20:25+5:302024-10-02T13:20:55+5:30

जिल्हा सत्र न्यायाधीशांचा निकाल 

Malvan Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj statue accident case sculptor Jaideep Apte's bail application rejected | Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला

Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला

ओरोस (जि.सिंधुदुर्ग) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याने आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.

पुतळा उभारतेवेळी ज्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते त्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही. त्याचबरोबर पुतळा उभारणीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते. याबाबतचा युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने जयदीप आपटेचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

जयदीप आपटे याने हे टेंडर २ कोटी ४ लाख रुपयांना घेतलेले होते आणि संपूर्ण रक्कम त्याला मिळालेली आहे. परंतु पुतळा उभारताना जे साहित्य वापरले ते निकृष्ट दर्जाचे होते आणि बांधकाम वगैरे सर्व निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा पुतळा कोसळला असा समितीचा अहवाल आला आहे. यात आपटे याचा सहभाग असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने या अगोदर चेतन पाटील याचा जामीन फेटाळलेला होता.

Web Title: Malvan Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj statue accident case sculptor Jaideep Apte's bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.