नेरूर येथील मांड उत्सव उत्साहात साजरा, पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या प्रतिकृती, देखावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:23 PM2022-03-22T14:23:02+5:302022-03-22T14:29:18+5:30

या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उत्सवामुळे कोकणातील रूढी पंरपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे.

Mand Utsav celebrations in Nerur, mythological events, replicas of deities based on stories, scenes | नेरूर येथील मांड उत्सव उत्साहात साजरा, पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या प्रतिकृती, देखावे

नेरूर येथील मांड उत्सव उत्साहात साजरा, पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या प्रतिकृती, देखावे

googlenewsNext

रजनीकांत कदम

कुडाळ : होळी सणानिमित्त तालुक्यातील नेरूर गावात मांड उत्सव साजरा केला जातो.  यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले रोंबाट व  पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य-दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती, देखावे साकारण्यात आले होते. हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यांतून नागरिकांनी गर्दी केली होती.

या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच  गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या उत्सवामुळे कोकणातील रूढी पंरपरांचे जतन नेरूरवासीय करीत आहेत हे विशेष आहे.

कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा,  सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. विशेष म्हणजे गावची ग्रामदेवताच श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण आहे. होळी सण येथील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात. या गावातील होळी सणानिमित्त असणारे रोंबाट हे खास आकर्षण असते. रसिक नागरिक या रोंबाटाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात.

यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध देखावा सादर केला होता. विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिंग दर्शन व कृष्णा उर्फ बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मूलाधार अवतार ओंकार दर्शन, असे भव्य-दिव्य देखावे सादर केले होते.

 

Web Title: Mand Utsav celebrations in Nerur, mythological events, replicas of deities based on stories, scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.