सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश
By admin | Published: April 26, 2017 05:22 PM2017-04-26T17:22:12+5:302017-04-26T17:22:12+5:30
२७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजलेपासून कार्यवाही
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २६ : जिल्ह्यात होणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, १ मे महाराष्ट्र दिन यादिवशी होणारी उपोषण-आंदोलने, अक्षय तृतीया उत्सव व बुध्द पोर्णिमा उत्सव तसेच जिल्ह्यात इतर दिवशी होणारे उपोषणे, मोर्चा, निर्देशने, रास्ता रोको आंदोलनासारखे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे दिनांक २७ एप्रिल २0१७ रोजी रात्रौ १२ वाजल्यापासून ते दिनांक ११ मे २0१७ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत या १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू केला आहे.
रविंद्र सावळकर, जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी प्राप्त असलेल्या शक्तींचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे दिनांक २७ एप्रिल २0१७ रोजी रात्रौ १२ वा. ते दिनांक ११ मे २0१७ रोजी रात्रौ १२ या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.