सावंतवाडीत मांगर आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:16 PM2020-03-05T20:16:00+5:302020-03-05T20:16:30+5:30
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील रहिवासी नंदू वारंग यांच्या मांगराच्या पडवीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मांगरातील सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळाले. यामध्ये जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.
सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा येथील रहिवासी नंदू वारंग यांच्या मांगराच्या पडवीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत मांगरातील सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळाले. यामध्ये जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले.
वारंग हे झोपी गेले होते. रात्री २च्या सुमारास त्यांना बाहेर मांगरातून धूर येत असल्याचे समजले. ते तातडीने बाहेर येऊन पाहतात तर मांगराला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती येथील पालिकेतील कर्मचाऱ्याला फोनद्वारे दिली. पालिकेचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत मांगरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये दोन दुचाकी, सायकल, सिलेंडर व इतर घरगुती साहित्य तसेच या आगीत पूर्ण मांगर जळून खाक झाला आहे. सुदैवाने या मांगरात कोण रहात नसल्याने सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही व मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळाचा पंचनामा झाला असून अधिक तपास सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. यामध्ये जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.