देणमध्ये आंबा, काजू बाग आगीत खाक

By Admin | Published: January 16, 2015 11:10 PM2015-01-16T23:10:29+5:302015-01-16T23:45:16+5:30

५0 लाखांची हानी : ३४ एकर क्षेत्र आगीत भस्मसात; विद्युत वाहिनी तुटल्याने आग

Mango and Cashew Bag in the donation | देणमध्ये आंबा, काजू बाग आगीत खाक

देणमध्ये आंबा, काजू बाग आगीत खाक

googlenewsNext

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागातील देण-धनगरवाडा येथे महावितरणची ४४० विद्युतभारित वाहिनी तुटून आंबा व काजू बागेवर पडल्याने लागलेल्या आगीत ३४ एकर क्षेत्रांतील ३५०० काजू कलमे, १०० आंबा कलमे आणि पाच लाखांचा ठिबक सिंचन प्रकल्प जळून खाक झाले. घटनास्थळी आलेले महावितरणचे कर्मचारी आणि शाखा अभियंत्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत वरिष्ठ येथे येऊन पाहणी करून पंचनामा करत नाहीत, तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सायंकाळपर्यंत पंचनामा होऊ शकला नाही. या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथून जवळच असलेल्या देण गावातील धनगरवाडा परिसरात कातळी जमिनीवर प्रसाद काशीनाथ मुळ्ये, कृष्णा मेवे, तसेच दिलीप देसाई यांनी आंबा-काजूची बाग फुलवली होती. आज, शुक्रवारी याच बागेवर महावितरणची वाहिनी तुटून आग लागली.
दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास धनगरवाडा भागातील ‘बिवळाचा सखल’ या भागातून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडत असल्याचे देण ग्रामस्थांच्या नजरेस पडले. भयंकर अशा आगीने संपूर्ण परिसरालाच वेढा घातला होता. वारा अन् कडकडीत ऊन असल्याने आग चारही बाजूला वेगाने पसरली होती. प्रसाद मुळ्ये, कृष्णा मेवे, देसाई यांच्याबरोबर शेकडो ग्रामस्थ मदतीला धावले. (वार्ताहर)

हलगर्जीपणाच कारणीभूत
महावितरणची ४४० दाबाची विद्युत वाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली होती. याची कल्पना वर्षभरापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही तार तुटून पडली. या आगीत ३४ एकरच्या जागेमधील ३५०० काजू कलमे जळून खाक झाली. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचे ठिबक सिंचन योजनाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बाजूच्या शेतातील १०० हापूस आंबा कलमांना या आगीचा फटका बसला. महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळेच एवढे मोठे नुकसान झाले.

Web Title: Mango and Cashew Bag in the donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.