आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:19 PM2018-11-24T17:19:49+5:302018-11-24T17:22:10+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Mango and Cashew nut Crops on Crops - Cloudy Climate: The Storm Workout of the Bargants | आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

googlenewsNext

-प्रथमेश गुरव । 

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साधारणत: पाऊस आटोक्यात आल्यानंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांधा काढणे अशी कामे बºयापैकी बागायतदारांनी उरकून घेतली. काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे.

शासनाकडून मात्र उपेक्षा
आतापर्यंत अनेक वेळा आंबा बागायतदारांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. आंबा पीक कधी कधी धोक्यातही येते. पण शासनाकडून मदत मिळत नाही. वेगवेगळ््या घोषणा फक्त केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकरी,  आंबा बागायतदार उपेक्षितच राहतो. आंबा पिकांना विमा संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागानेही आंबा पीक जास्तीत जास्त यावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अडीअडचणीच्या काळात आंबा बागायतदारांच्या मागे उभे राहणेही गरजेचे आहे. मात्र सर्व स्तरावर शासनाकडून आंबा बागायतदारांची उपेक्षाच होत असते.

कोकणातील शेतकरी मागे पडतो
कोकणात फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. पण हे आंबा पीक काही कारणांनी धोक्यात आल्यास त्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो. शासनस्तरावरही दखल घेतली जात नाही. या उलट विदर्भ, मराठवाडा येथे कोणतेही पीक धोक्यात आले तर शासन त्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र आपला शेतकरी शासनाशी भांडत नाही आणि येथील राजकीय नेतेही शासनाकडे भांडण्यात कमी पडतात. त्यामुळे शेतकरी कमी पडतो.

हलक्या पावसामुळे अशाप्रकारे आंबा पिकावर करपा व तुडतुड्या रोगाची शक्यता आहे.

पानावरील करपा 

मोहोरावरील करपा

आंब्यावरील तुडतुडे

Web Title: Mango and Cashew nut Crops on Crops - Cloudy Climate: The Storm Workout of the Bargants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.