आंबा बागायतदारांची आता ‘मँगोनेट’साठी नोंदणी सुरू

By admin | Published: December 5, 2014 10:38 PM2014-12-05T22:38:17+5:302014-12-05T23:30:44+5:30

राष्ट्रीय कृषी विकास : यंदा निर्यात वाढण्याची शक्यता

Mango growers now get registered for 'mangnet' | आंबा बागायतदारांची आता ‘मँगोनेट’साठी नोंदणी सुरू

आंबा बागायतदारांची आता ‘मँगोनेट’साठी नोंदणी सुरू

Next

देवरुख : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांसाठी मँगोनेट योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील आंबा बागायतदारांची मँगोनेटसाठी नोंदणी करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १० डिसेंबरपर्यंत तालुका कृ षी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृ षी अधिकारी बी. जी. कदम यांनी केले आहे.
युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा खरेदीला तात्पुरती बंदी घातली होती. त्यामुळे निर्यातदार शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. मात्र, यावर्षी आंबा निर्यातीमध्ये शेतकऱ्यांना कोणतीही समस्या येऊ नये, याकरिता जिल्ह्यात मँगोनेटची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. शेतकऱ्यांना निर्यातीस प्रोत्साहन देण्याकरिता शासनाने मँगोनेट, व्हेजनेट प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीअंतर्गत नोंदणी केल्यानंतर निर्यात वाढविण्यासाठी कीडरोग व कीडनाशक अंशमुक्त शेतीमालाची हमी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जागृत राहून तालुका कृ षी अधिकारी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी कार्यालय, कृ षी पर्यवक्ष्ोक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
ही नोंदणी विनामूल्य असून, नोंदणीसाठी बागेचा शेताचा स्थलदर्शक नकाशा व ७/१२, ८ अ उतारा, १ हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी, अधिक क्षेत्र असल्यास प्रती १ हेक्टर क्षेत्रासाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच बाग स्वतंत्र असल्यास स्वतंत्र नोंदणी करणे गरजेचे असल्याचे तालुका कृ षी कार्यालयाने म्हटले आहे. युरोपीय देशांची गतवर्षी आंबा खरेदीला तात्पुरती स्थगिती होती. मात्र, आता याबाबत समस्या येऊ नये म्हणून कृषी अधिकाऱ्यांनी बागायतदारांशी संपर्क साधला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mango growers now get registered for 'mangnet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.