मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

By admin | Published: June 7, 2017 12:14 AM2017-06-07T00:14:12+5:302017-06-07T00:14:12+5:30

मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

Mangrar at Madura, fire in shop | मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : मडुरा-माऊली मंदिरासमोरील मांगर व दुकानाला आग लागून मांगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दुकानातील सामान जळून सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
मडुरा-परबवाडी येथील चंद्रकांत महादेव गावकर यांचा माऊली मंदिरासमोर मांगर आहे. त्या मांगरातच लाकडी दुकान व हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे गावकर हे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मांगराला भीषण आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून ड्युटी आटोपून येणाऱ्या युवकाच्या दृष्टीस हे दृश्य पडले. त्याने स्थानिक युवकांना मोबाईलवरून आगीची माहिती दिली. युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मांगर व दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
गावकर यांनी मडुरा तलाठी एन. बी. दळवी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मांगर पूर्णपणे आगीत खाक झाला होता. शिवाय मांगरातील लाकडी दुकान, दुकानातील फ्रीज, स्टेशनरी वस्तू, कडधान्ये, कोल्ड्रिंक्स आगीत जळून खाक झाली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा दावा वीज वितरणचे वायरमन यांनी केला, तर ग्रामस्थांनी विद्युतभारित वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याचा आरोप केला. शिवाय जास्त क्षमतेची तार फ्युजमध्ये वापरण्यात आल्याने स्पार्किंग झाल्यानंतर फ्यूज उडाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
वीज वितरणचे सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी मडुरा दशक्रोशी उत्कर्ष समिती अध्यक्ष सुरेश गावडे, प्रकाश शेर्लेकर, पोलीस पाटील नितीन नाईक, नारायण परब, दिलीप परब, उपसरपंच उल्हास परब, संदीप परब, बंटी गावकर, अतुल गावकर, दिनेश परब, रामा परब, बाळू गावडे, बब्या परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, दिलीप घाडी, तात्या शेर्लेकर, जगन्नाथ परब आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेने गावकर कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात
चंद्र्रकांत गावकर यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. दुकानाच्या उत्पन्नातूनच ते कुटुंब चालवितात. आगीत दुकान खाक झाल्याचे समजताच ते पूर्णपणे कोलमडले. यावेळी स्थानिकांनी त्यांना धीर देत चार दिवसांत पुन्हा दुकान उभे करून देण्याचा शब्द दिला. त्यादृष्टीने मदत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. काही ग्रामस्थांनी श्रमदान करण्याची ग्वाही दिली.

Web Title: Mangrar at Madura, fire in shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.