मराठा समाजाने आता संघर्षाची तयारी करावी !: नितेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:08 AM2020-12-26T11:08:17+5:302020-12-26T11:09:45+5:30
Maratha Reservation NiteshRane Sindhudurg- मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .
कणकवली: मराठा समाजाला इडब्ल्यूएसच्या सवलती लागू करणे म्हणजे यापुढे आरक्षण मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे.न्यायालयात याच सवलतीचा दाखला देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज नाही असे सांगितले जाणार आहे. त्यामुळे सरकारचा हेतू कळला असून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिला नाही . त्यामुळे मराठा समाजाने आता सर्व चर्चा थांबवावी आणि संघर्षाची तयारी करावी असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी येथे केले .
कणकवली येथे शुक्रवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , राज्य सरकारकडून १० टक्केची सवलत देऊन मराठा समाजाला आरक्षणाचे फायदे देत आहोत हे न्यायालयात दाखवले जाणार आहे. अशी भूमिका घेऊन राज्यसरकारने मराठा आरक्षण देणार नाही हे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
त्यासाठीच अशा प्रकारच्या पळवाटा काढल्या जात आहेत.मराठा समाजाने राज्यसरकारच्या धूळफेकीला बळी पडू नये . हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही . त्यामुळे मराठा समाजाने आपली पुढची भूमिका घ्यावी आणि आपल्या भविष्यासाठी सरकार विरोधात वातावरण तयार करावे . असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले .