Maratha Reservation : विघ्नसंतोषी लोकांकडून मराठा समाजावर आरोप - सुहास सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:41 PM2018-07-29T17:41:04+5:302018-07-29T17:41:56+5:30

सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने कुडाळ शहर व तालुक्यात शांततेने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले असतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्ती मराठा समाजाच्या  आंदोलनावर नुकसान केल्याचे खोटे आरोप करून शहरातील तसेच जिल्ह्यातील वातावरण बिघडवू पहात आहेत

Maratha Reservation: The allegations against the Maratha community by the Some people | Maratha Reservation : विघ्नसंतोषी लोकांकडून मराठा समाजावर आरोप - सुहास सावंत

Maratha Reservation : विघ्नसंतोषी लोकांकडून मराठा समाजावर आरोप - सुहास सावंत

Next

कुडाळ : सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने कुडाळ शहर व तालुक्यात शांततेने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले असतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्ती मराठा समाजाच्या  आंदोलनावर नुकसान केल्याचे खोटे आरोप करून शहरातील तसेच जिल्ह्यातील वातावरण बिघडवू पहात आहेत, अशी प्रतिक्रिया सकल मराठा क्रांतीचे जिल्हा संयोजक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आम्ही नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली असून, चर्चेतून उत्तर शोधण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे वाद वाढवायचा की नाही हे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने ठरवावे, असे आवाहन त्यांनी व्यापारी संघटनेला केले आहे. 
सकल मराठा समाज क्रांती मोर्चातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता छेडलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 
यावेळी विक्रांत सावंत, धीरज परब, दादा साईल, सुनील पवार, डॉ. प्रवीण सावंत, संध्या तेरसे, प्रज्ञा राणे, साक्षी सावंत, अश्विनी गावडे, बाबल गावडे, संग्राम सावंत, कल्पेश सुद्रिक, मोहन सावंत, अ‍ॅड. सुधीर राऊळ तसेच सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी अ‍ॅड. सावंत यांनी सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारलेले जिल्हा बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या मराठा समाज बांधव-भगिनी, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ट्रक चालक-मालक वाहतूक संघटना यांच्यासह प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच आंदोलनप्रसंगी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. 
अ‍ॅड. सावंत म्हणाले, कुडाळ शहरात २ हजार ५०० मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वांनी शांततेत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कुडाळ एस. एन. देसाई चौक, बाजारपेठ, महामार्ग अशा काढण्यात आलेल्या रॅलीलाही उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे  पोलिसांनी चित्रीकरणही केले. रॅली शांततेत पार पडली.   
मात्र, पोलीस ठाण्यात कोणीही कसलीच तक्रार दाखल केली नसतानाही काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी आपल्या दुकानांवर रॅलीतील आंदोलनकर्त्यांनी लाथा मारल्या, दगड मारल्याचे खोटे आरोप केले. आंदोलनाच्या दिवशी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने तातडीची सभा घेऊन निषेध रॅलीही काढली. व्यापाºयांनी घेतलेल्या सभेत कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. हा प्रकार केवळ विघ्नसंतोषी लोकांमुळेच घडला असून, शहरातील वातावरण बिघडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला. 
चौकट
मराठा बांधवांना अडकविण्यासाठी ‘३0७’
येथील पोलिसांनी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनप्रसंगी कसाल कुडाळ येथे लाठीचार्ज केला आणि आमच्याच काही युवकांना अडकविण्यासाठी जाणीवपूर्वक ३०७ हे कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे युवकांवर गुन्हे दाखल करण्यापूर्वी आमच्यावर गुन्हे दाखल करा, असे आवाहन अ‍ॅड. सावंत यांनी पोलिसांना केले. 
‘त्या’ मेसेजचे समर्थन चुकीचे
मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात एका व्यक्तीने एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर मराठा समाजाने चौकात येऊन माफी मागावी, असा मजकूर टाकला होता. 
हा मजकूर दोन समाजात तेढ निर्माण करणारा असूनही यासंदर्भात व्यापारी संघटनेच्या बैठकीत चर्चा होऊन काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याचे समर्थन केले. हे दुर्दैवी असल्याचे अ‍ॅड. सावंत यांनी सांगितले. 
विनायक राणेंच्या मराठा समाज पाठिशी 
कुडाळच्या मराठा समाज रॅलीत आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष विनायक राणे तसेच नगरसेवक गणेश भोगटे आदी उपस्थित होते. मात्र, कोणत्याही प्रकारची घटना घडली नसताना व्यापारी संघटनेच्या सभेत नगराध्यक्ष विनायक राणे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. यापुढे त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास समस्त मराठा समाज त्यांच्या पाठिशी राहील, असे अ‍ॅड. सावंत म्हणाले. 

Web Title: Maratha Reservation: The allegations against the Maratha community by the Some people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.