मराठा आरक्षण : आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:44 PM2020-09-12T14:44:54+5:302020-09-12T14:53:19+5:30
मराठा समाजाला भाजपा सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार विरोधात ट्वीटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कणकवली : मराठा समाजाला भाजपा सरकारच्या काळात मिळालेले आरक्षण स्थगित झाल्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार विरोधात ट्वीटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
'या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 10, 2020
आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले..
कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच..कश्यासाठी??
आता मूक मोर्चे नाहीच..
आता संघर्ष अटळ आहे!!
या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला. आज आमच्या समाजाचे भविष्य अंधारात गेले. कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे, कशासाठी ? आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ आहे अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आरक्षण ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाकडे वर्ग. शिक्षणिक प्रवेशात व नोकरभरतीत आरक्षणाला स्थगीती!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2020
महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध!!
आमदार नीतेश राणे यांनी ट्वीटद्वारे राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना लक्ष्य केले आहे. कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा समाजाच्या हक्कासाठी आमदार राणे पुन्हा रस्त्यावर उतरणार असे एकंदर दिसत आहे.