Maratha reservation- मराठा आरक्षण स्थगितीवर याचिका दाखल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:57 PM2020-09-16T16:57:22+5:302020-09-16T16:58:30+5:30
राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, देवगड यांच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
देवगड : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, देवगड यांच्यावतीने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी समन्वयक संदीप साटम, उमेश कणेरकर, किसन सूर्यवंशी, संकेत लब्दे, शामराव पाटील, नंदू देसाई, राजू भुजबळ, पंकज दुखंडे, युधी राणे, शैलेश लोके, प्रकाश सावंत, सुरेश घाडी, बाळा कदम, सत्यवान कदम, राजाराम राणे आदी उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजात तीव्र भावना उमटू लागल्या आहेत. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी त्याग केला असून अनेकांनी बलिदानही दिले आहे. याचा आपण विचार करून मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून स्थगिती उठविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने तातडीचे निर्णय घ्यावेत. या मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.