Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलन शांततेत करा, मराठा समाज नेत्यांचे आवाहन : कणकवलीत नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:53 PM2018-08-08T16:53:53+5:302018-08-08T16:56:13+5:30

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी कणकवलीत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करायचे असून कुणीही शांतता भंग होईल असे अनुचित कृत्य करु नये, असे आवाहन मराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.

Maratha Reservation: Sindhudurg: Jail Bharo Movement to peace, appease Maratha community leaders: Planning meeting in Kankavli | Maratha Reservation : सिंधुदुर्ग : जेलभरो आंदोलन शांततेत करा, मराठा समाज नेत्यांचे आवाहन : कणकवलीत नियोजन बैठक

कणकवली मराठा समाज संपर्क कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी एस.टी.सावंत, लवू वारंग, भाई परब, अ‍ॅड. हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजेलभरो आंदोलन शांततेत करा : कणकवलीत नियोजन बैठकमराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत नेत्यांचे आवाहन

कणकवली : सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी कणकवलीत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करायचे असून कुणीही शांतता भंग होईल असे अनुचित कृत्य करु नये, असे आवाहन मराठा समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत करण्यात आले.

आंदोलनासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी कणकवली तालुका मराठा समाज संपर्क कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन केले.

मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये मराठा समाज बांधवानी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींनी यावेळी केले. त्याचप्रमाणे प्रशासनाने देखील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाला सहकार्य करावे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला देऊ असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

तसेच गुरुवारी ९ आॅगस्टला होणाऱ्या जेलभरो आंदोलनात कणकवली तालुक्यातील प्रत्येक मराठा कुटुंबातील व्यक्तींनी तसेच आंदोलन समर्थकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, सुहास सावंत, सुशिल सावंत, भाई परब, अ‍ॅड. हर्षद गावडे, सोनू सावंत, बच्चू प्रभुगावकर, सुशांत दळवी, सुभाष सावंत, महेंद्र घाडीगांवकर, नयन राणे, राजू राणे, ओंकार गावडे, सिद्धांत निकम, यश सावंत आदी मराठा बांधव उपस्थित होते.

Web Title: Maratha Reservation: Sindhudurg: Jail Bharo Movement to peace, appease Maratha community leaders: Planning meeting in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.