समुद्री उद्योग, सर्र्व्हिस इंडस्ट्रीला चालना

By admin | Published: November 25, 2015 11:25 PM2015-11-25T23:25:58+5:302015-11-25T23:25:58+5:30

रवींद्र वायकर : सांगुळवाडी येथील शैक्षणिक संकुलाच्या वास्तूचे उद्घाटन

Marine industry, the surge in the industry industry | समुद्री उद्योग, सर्र्व्हिस इंडस्ट्रीला चालना

समुद्री उद्योग, सर्र्व्हिस इंडस्ट्रीला चालना

Next

वैभववाडी : कोकणात भरपूर काही करण्याची संधी असतानाही दूरदृष्टी नसलेल्या येथील राजकारण्यांनी कोणत्याच सुखसोयी न देता कोकणी माणसाला करपवून टाकले. मात्र, येथील साधनसंपत्तीच्या आधारे आमचे सरकार येताच कोकणाला हवे ते देण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला आहे. कोकणातील समुद्र किनारपट्टी विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी समुद्री उद्योगांना चालना देणारे शिक्षण आणि सर्व्हिस इंडस्ट्री सुरु करण्याची गरज आहे. त्याही दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगुळवाडी येथे केले.
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगुळवाडी येथील नूतन शैक्षणिक वास्तूचे उदघाटन मंत्री वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे परभणीचे आमदार तथा संस्थाध्यक्ष डॉ. राहूल पाटील, तहसीलदार जी. आर. गावीत, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तिकर, बाळाभाई कदम, पवन जाधव, सूरज चव्हाण, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, नगरसेवक बाळा नर, संचालक संदीप पाटील, सरपंच प्रकाश रावराणे, सुधाकर येवले, आदी उपस्थित होते. मंत्री वायकर पुढे म्हणाले की, राज्याच्या विधिमंडळात आतापर्यंत कोकणातील फक्त नुकसान भरपाईच चर्चा व्हायची! येथे आवश्यक सोयी सुविधांची चर्चाच होत नव्हती, याचीच खंत वाटते. गरज असूनसुद्धा मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आधीचे सत्ताधारी करु शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे विकासाच्या दृष्टीचा अभाव होता. विस्तीर्ण समुद्र किनारे असुनही ते विकसित करुन आवश्यक सुविधा निर्माण न केल्यामुळे कोकणात अपेक्षेप्रमाणे पर्यटक येत नाहीत, अशी टीका करीत समुद्री उद्योगांना चालना देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. दबलेल्या, राजकारण्यांनी करपवून टाकलेल्या कोकणातील लोकांना दिशा देण्यासाठी प्रगत शिक्षणाची गरज होती. ती आमदार डॉ. राहूल पाटील यांनी पूर्ण केली आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांच्या संस्थेला आवश्यक ते सहकार्य आम्ही करु, असे आश्वासन मंत्री वायकर यांनी यावेळी दिले.
आमदार डॉ. राहूल पाटील म्हणाले, आमच्या सरकारने स्मार्ट सीटी योजना आणली आहे. परंतु व्हिलेज स्मार्ट होत नाहीत, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शेवटच्या घरात शिक्षणरुपी वाघिणीचे दुध पोहचविण्याच्या उद्देशाने आपण कोकणात आलो. तंत्रशिक्षण आणि रोजगार आधी ग्रामीण भागात पोचविण्याची गरज आहे. समांतर विकास साधायचा असेल तर खेड्यापाड्यात अशा संस्था निर्माण होण्याची अत्यंत गरज
आहे. (प्रतिनिधी)
इथल्यांनी हॉटेल्स काढली : त्यामुळेच प्रगती खुंटली
४परभणीतून कोकणात येऊन शिक्षणाचा अंकुर रुजविण्याचे कार्य आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केले आहे. हे करायला सिंहाचे काळीज लागते. आमच्या इथल्या राजकारण्यांनी मात्र, कोकणातील गरजांकडे दुर्लक्ष करून जमीनी घेऊन आपली हॉटेल्स काढली. त्यामुळेच कोकणी माणसाची प्रगती खुंटली, अशी टीका करीत आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आपले कोकणातील शैक्षणिक काम असेच अखंडपणे सुरू ठेवावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणणार : राहूल पाटील
४आपण पंधरा वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा या गावात एसटी सुद्धा येत नव्हती. आता या शिक्षण संकुलात विविध अभ्यासक्रमांचे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी येत्या दोन वर्षात येथे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आपण आणणार आहोत, अशी घोषणा संस्थाध्यक्ष आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली.

Web Title: Marine industry, the surge in the industry industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.