शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्गात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:46 IST2018-08-20T13:24:53+5:302018-08-20T14:46:03+5:30
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी दाखल झाला आहे

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्गात दाखल
सिंधुदुर्ग : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (20 ऑगस्ट) दाखल झाला आहे. जिल्हा पोलिसांनी तसेच वैभववाडी ग्रामस्थांनी करूळ येथे जाऊन वीर सिंधू पुत्राचा अस्थिकलश सन्मानाने ताब्यात घेतला. यावेळी मोठ्या संख्येने रॅली काढून कलश वैभववाडी बाजार पेठेत जाण्यासाठी सज्ज झाला होता.
एडगाव येथील शहीद विजय साळसकर स्मारकानजिक ग्रामस्थांनी मानवंदना दिली. कलश वैभववाडी बाजारपेठेत दर्शनास ठेवण्यात येणार आहे. उद्या अस्थिकलश जिल्हावासीयांच्या दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यात फिरवण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता कुणकेश्वर पवित्रस्थळी अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. वैभववाडीमध्ये सोमवारी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी दर्शन घेतले.