Sindhudurg Crime: शिरोडा बाजारपेठेत भीषण आग; पाच दुकाने खाक; आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:28 PM2023-02-24T16:28:48+5:302023-02-24T16:29:26+5:30

वाऱ्यामुळे आग आजूबाजूला पसरली

Massive fire in Shiroda Market Sindhudurg, Conditional efforts to extinguish the fire | Sindhudurg Crime: शिरोडा बाजारपेठेत भीषण आग; पाच दुकाने खाक; आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 

संग्रहीत छाया

googlenewsNext

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून आगीचा धूर येऊ लागल्याने आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ आजू बाजूच्या नागरिकांनी संबंधित दुकान उघडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही दुकाने फार जुनी असल्याने तसेच एकमेकाला लागून दुकाने असल्याने वाऱ्याच्या झोक्याने आजूबाजूला आग पसरली. बाजूच्या पाच दुकानांमध्ये ही आग पोहोचली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ या दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ला नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलाविण्यात आला असून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

Web Title: Massive fire in Shiroda Market Sindhudurg, Conditional efforts to extinguish the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.