जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 20, 2023 04:00 PM2023-12-20T16:00:43+5:302023-12-20T16:01:14+5:30

आगीवर नियंत्रण मिळविताना धावपळ

Massive fire to a shop in Jamsand, loss of lakhs of rupees | जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

देवगड (सिंधुदुर्ग) : जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानामधील वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजुबाजुच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूंनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे विनोद पटेल यांच्या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पटेल हे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानाच्या वरील मजल्यावरील रहिवाशांनी दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती दिली. मात्र, दुकानाच्या ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या, कलर सामान असल्यामुळे आतमध्ये जाणे शक्य होत नसल्याने पटेल बंधू येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

शर्थीचे प्रयत्न अपुरे

घटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळतात नगरपंचायतीचे कर्मचारी अग्निशमन बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, विनोद पटेल यांच्या हार्डवेअरमध्ये असलेल्या बऱ्याच वस्तूंनी पेठ घेतल्यामुळे पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर स्थानिक व्यापारी पटेल बंधू तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असले तरी होणारी नुकसानी ते टाळू शकले नाहीत.

Web Title: Massive fire to a shop in Jamsand, loss of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.