'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 10:45 AM2021-01-22T10:45:12+5:302021-01-22T10:46:11+5:30

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली

Meeting with CM as soon as the report of the committee of experts for Konkan development arrives, sharad pawar | 'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

Next

अनंत जाधव 

सावंतवाडी : कोकणचा विकास करण्यासाठी तज्ञांची समिती अभ्यास करत असून, या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात असा सल्ला दिला आहे. त्याचा अतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, पुंडलिक दळवी,चित्रा देसाई, हिदायततुल्ला खान उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली, पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यापीठात आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ काम करतात, त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल, ही समिती येथील पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त अन्य काही विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे देतील. त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कोकण विकासाला दिशा दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारवर टिका करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्याही सुरक्षाही काढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही. सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही, तर पोलिसांची एक समिती ठरवत असते. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षा वाढ व कमी केल्या गेल्या आहेत. पण, केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे, असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

राणेंना धोका की राणेंपासून धोका
भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असे म्हटले होते. पण, यावर पवार यांनी राणेपासून धोका का असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली. तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची की नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.
 

Web Title: Meeting with CM as soon as the report of the committee of experts for Konkan development arrives, sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.