सिंधुदुर्गमधील धान्य दुकानदारांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:58 PM2017-08-05T17:58:52+5:302017-08-05T17:58:52+5:30
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांच्या मागण्यासंदर्भात पालकमंत्री केसरकर यांनी सावंतवाडी येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी रास्तभाव धान्य दुकानदारांना शासनच्या द्वारपोच योजनेप्रमाणे वाहतूक भाडे देणे तसेच दुकानादारांच्या कमिशनमध्ये वाढ करणे या मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. या मागण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांच्या सोबत मंगळवारी बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. |