विषय अंगलट आल्याने सभात्याग

By Admin | Published: November 30, 2015 11:12 PM2015-11-30T23:12:46+5:302015-12-01T00:16:42+5:30

प्रमोद सावंत यांनी शिवसेनेवर केला पलटवार

The meeting was attended | विषय अंगलट आल्याने सभात्याग

विषय अंगलट आल्याने सभात्याग

googlenewsNext

सावंतवाडी : वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याचा भ्रष्टाचाराचा अहवाल आम्ही सभागृहात मांडणार, हे यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र, शिवसेनेने हा विषय काढून अंगलट आल्यासारखे त्यांना वाटल्यानेच त्यांनी सभागृहातून पळ काढला. शिवसेनेला हा अहवाल दडपवायचा होता, असा पलटवार सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती प्रमोद सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.
वेर्ले येथील शौचालय घोटाळ्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले होते. हा अहवाल पंचायत समिती बैठकीत मांडण्यात येणार, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे हा अहवाल मांडण्यापूर्वीच शिवसेने सभागृहातून सभात्याग केला. हे त्यांचे चुकीचे पाऊल होते. आम्ही सांगितल्याप्रमाणे अहवाल मांडणारच होतो. पण शिवसेनेच्या सदस्यांना सभाशास्त्रच माहिती नाही, असा आरोपही यावेळी सभापती प्रमोद सावंत यांनी केला.
आमच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या वल्गना ते गेले कित्येक महिने करीत आहेत. त्यांनी अविश्वास ठराव आणावाच, असे जाहीर आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
तसेच वेर्ले येथील शौचालय भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल आम्ही मांडणार होतो. मात्र, शिवसेनेला हा विषय अंगलट येणार असे वाटल्यानेच त्यांनी चर्चा करण्यापूर्वी सभात्याग केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यानी आधी अधिकारी व कर्मचारी द्यावेत
वेर्ले येथील शौचालय घोळाचा अहवाल देण्यास विलंब होण्याचे कारण म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या आमच्याकडे कमी आहे. पालकमंत्री केसरकर यांच्या मतदार संघातील पंचायत समिती असल्याने अधिकारी व कर्मचारी देण्याची मागणी करा, असे सभापतींनी शिवसेना सदस्यांना सांगितले.
भाजप सदस्य बैठक संपल्यानंतर शिवसेनेसोबत
वेर्ले शौचालय भ्रष्टाचारावरून हात उंचावून शिवसेनेला साथ देणाऱ्या भाजप सदस्या श्वेता कोरगावकर या शिवसेनेचा सभात्याग केला तरी सभागृहातच बसून राहिल्या आणि सभा संपल्यानंतर शिवसेनेसोबत आल्या. माजी सभापती प्रियंका गावडे यांनी कोरगावकर यांना विचारले असता सभात्याग कशासाठी ते माहित नसल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.

Web Title: The meeting was attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.