विजय सावंत यांच्याकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी

By admin | Published: July 8, 2014 12:31 AM2014-07-08T00:31:08+5:302014-07-08T00:34:57+5:30

सोमवारी देवगड येथे जुन्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या

Meetings of Congress workers from Vijay Sawant | विजय सावंत यांच्याकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी

विजय सावंत यांच्याकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी

Next

कणकवली : आमदार विजय सावंत यांनी सोमवारी देवगड येथे जुन्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सिंधुदुर्गात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार सावंत यांनी घेतलेल्या या भेटींमुळे तर्कवितर्क लढविण्यात येत होते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदार विजय सावंत यांनी स्वपक्षीय नेते नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. आमदार सावंत यांच्या नियोजित साखर कारखान्याला नारायण राणेंच्या गोटातून झालेल्या विरोधाने चवताळलेल्या आमदार सावंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आरोपांची सरबत्ती केली होती. आताही कॉँग्रेसअंतर्गत वेगाने घडामोडी होत आहेत.
नीतेश राणेंनी राणेसमर्थकांवरच तोंडसुख घेतल्याने काही समर्थक नाराज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेनाप्रवेशाची चर्चा जशी रंगत आहे. तशी नारायण राणेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राणेंच्या पक्षबदलाचीही चर्चा झडू लागली आहे. निलेश राणेंच्या पराभवाने नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील ताकदीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेची गणिते बदलली जाण्याच्या शक्यतेने आमदार सावंत यांनी भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा सोमवारी राजकीय गोटात रंगली होती. त्यामुळे सावंत यांच्या भेटीगाठीला महत्व आले
आहे. (प्रतिनिधी)
कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विकास महामंडळ करावे
संस्थेचा वर्धापनदिन : जिल्हास्तरीय महिला मत्स्य व्यावसायिकांच्या मेळाव्यात मागणी
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार ज्या गावात मासेमारी करतात, ती गावे मच्छीमार गावे घोषित करावीत व कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विकास महामंडळ स्थापन करावे, अशी एकमुखी मागणी सोमवारी वेंगुर्लेत झालेल्या जिल्हास्तरीय महिला मत्स्य व्यावसायिकांच्या मेळाव्यात करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी येथील साई मंगल कार्यालयात महिला मत्स्य व्यावसायिकांच्या स्रेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संंस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्ष श्वेता हुले, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना हडकर, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, चेतना केळूसकर, निकिता रेडकर, उद्योजक प्रकाश तांबोसकर, प्रा. जय क्षीरसागर, शिल्पा केळुसकर, ज्योती गिरप, पेरपेत्तीन डिसोजा, श्रमिक मच्छीमार संस्थेचे संघटक दिलीप घारे, हर्षदा देवधर, डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.
मच्छिमारांना दरवर्षी मत्स्य दुष्काळास सामोरे जावे लागते. मात्र, याकडे शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडतो. यावर उपाय म्हणून मच्छिमारांनी पारंपरिक मच्छिमारीबरोबरच कृत्रिम मत्स्यपालन व्यवसाय केल्यास याचा चांगला फायदा मच्छिमारांना होऊ शकतो, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.
केरोसिन, मच्छीमार्केट सुविधा याबरोबरच मच्छिमारांच्या २१ मागण्या आहेत. संस्थेच्या प्रयत्नामुळे यातील तीन-चार मागण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या. उर्वरित मागण्या प्रलंबित आहेत. पाँडेचेरी, तामिळनाडू, केरळ येथील मच्छीमार संघटीत असल्याने तेथे विकास झाला. येथील मच्छिमारांनीही अशाप्रकारे संघटीत होऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी झटले पाहिजे. आज मत्स्य खात्याकडे मत्स्य व्यावसायिकांसाठी कोणत्याही योजना नसल्याचेही उपरकर यांनी स्पष्ट केले.
मच्छीमारांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी मच्छीमार महिलांनी प्रथम संघटीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक महिला मच्छीमारांनी संस्थेचे सदस्य व्हा. तसेच सुकळवाड येथे लवकरच फिश गॅलरी निर्माण करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे संंस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच यासाठी सर्वांचे संघटीत प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी महिलाविषयक कायदे, डॉ. हर्षदा देवधर यांनी महिलांचे आरोग्य,
डॉ. प्रसाद देवधर यांनी महिलाविषयक विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. जय क्षीरसागर, अर्चना हडकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्वेता हुले यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य महिला
मत्स्य व्यावसायिक उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Meetings of Congress workers from Vijay Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.