राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार; दीपक केसरकरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:24 PM2022-09-24T16:24:12+5:302022-09-24T17:08:28+5:30
सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असतं, असंही दीपक केसरकरांनी यावळी सांगितलं.
मुस्लिम समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे. त्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. हे सर्वेक्षण आरक्षणासाठी नाही. मागील सरकारच्या काळात जे निर्णय घेतले गेले, त्यात आक्षेपार्ह काही असल्यास बदल केले जातील. त्यासाठी हे सर्वेक्षण आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. सरकारचे धोरण हे प्रत्येक समाजाची उन्नती व्हावी असंच असतं, असंही दीपक केसरकरांनी यावळी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण हे प्राधान्याने देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी स्वतः तज्ज्ञाशी दिल्लीत जाऊन चर्चा केली आहे. त्यामुळे निश्चितपणे यातून मार्ग निघेन, अशी आमची खात्री आहे, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. शिक्षण विभागात महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती केली जाणार असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं.
कोकणात ५ हजार शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार असून अतिरिक्त शिक्षणाचे समायोजन करून राज्यात शिक्षण विभागात मेगा भरती केली जाणार आहे. तसेच ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती राज्यात केली जाणार असून याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं.