आंगणेवाडी यात्रोत्सवात भरणार बचत गटांचा 'मेळा'

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 28, 2024 03:15 PM2024-02-28T15:15:32+5:302024-02-28T15:15:45+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांचे आयोजन : नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

Mela of bachat groups to be held during Anganewadi Yatrotsavam | आंगणेवाडी यात्रोत्सवात भरणार बचत गटांचा 'मेळा'

आंगणेवाडी यात्रोत्सवात भरणार बचत गटांचा 'मेळा'

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या हेतूने आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँक संचालक तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन ३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, मसुरे सरपंच संदिप हडकर, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर, उमेदचे वैभव पवार, महिला विकास आर्थिक महामंडळ समन्वय अधिकारी नितीन काळे, बिळवस सरपंच मानसी पालव, बँक संचालक संदीप (बाबा) परब, व्हिक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने आंगणेवाडी व देउळवाडा, मसुरे गावच्या ग्रामस्थांनी तसेच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Mela of bachat groups to be held during Anganewadi Yatrotsavam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.