दापोली तालुक्यात व्यापाऱ्याचे अपहरण, सुटका; सहा अटकेत

By admin | Published: November 11, 2015 11:06 PM2015-11-11T23:06:10+5:302015-11-11T23:41:16+5:30

अपहरणकर्ते सुपारीदादा : चित्रपट दृश्याला शोभेल असा थरार

Mercenary abducted, rescued in Dapoli taluka; Six suspects | दापोली तालुक्यात व्यापाऱ्याचे अपहरण, सुटका; सहा अटकेत

दापोली तालुक्यात व्यापाऱ्याचे अपहरण, सुटका; सहा अटकेत

Next

खेड : चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे एका चिरेखाण व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न सहाजणांनी केल्याचा प्रकार बुधवारी दापोली तालुक्यातील उन्हवरे फाटा येथे घडला. काही जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार तत्काळ पोलिसांच्या कानावर घातल्याने खेडमध्ये पोलिसांनी फिल्डिंग लावून अपहरणकर्त्यांची इनोव्हा अडविली आणि चिरेखाण व्यावसायिक रूपेश बाजीराव पवार यांची सुटका केली. अपहरण करणाऱ्या सहाजणांना गजाआड करण्यात आले आहे. ते सुपारी घेऊन अशी कामे करणारे मुंबईतील सराईत असल्याची माहिती पुढे येत आहे.दापोली तालुक्यातील गावतळे येथील चिरेखाण व्यावसायिक रूपेश पवार (वय ३५) आपल्या बोलेरो गाडीतून दापोलीहून गावतळेकडे जात होते. वाकवली दरम्यान उन्हवरे फाटा येथून ते पुढे निघाले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून काहीजण खाली उतरले. त्यांनी पवार यांची गाडी अडवली. आपण सीबीआय आॅफिसर असल्याची बतावणी करीत त्यांनी पवार यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर इनोव्हा कारमध्ये कोंबले.
यावेळी चांगलीच झटापट झाली. ही झटापट तेथील काही लोकांनी पाहिली. त्यांनी तेथून काही अंतरावर असलेले सामाजिक कार्यकर्ते नीलेश शेठ यांना दूरध्वनीवरून कळविले. नीलेश शेठ यांनी तत्काळ खेड पोलिसांना हा प्रकार कळविला. खेड पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच फिल्डिंग लावली. पोलीस कर्मचारी आप्पा दाभोळकर, नरेंद्र चव्हाण आणि अनंत मयेकर यांनी खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे इनोव्हा कार अडवली आणि रमेश पवार यांची सुटका केली. इनोव्हामधील सहा अपहरणकर्त्यांसह गाडी (पान ५ वर)


अटक केलेल्यांची नावे
याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये अब्दुल हमीद सय्यद अहमद (विक्रोळी, मुंबई), गफार हमीद जहरअली, अनस सागर खान (कोपरखैरणे, नवी मुंबई), यतीन चिंतामणी चौगुले (डोंबिवली) पंकज लिंबू (ऐरोली, नवी मुंबई) शेख आबीद गफूर रौब (विक्रोळी, मुंबई) यांचा समावेश आहे.


व्यावसायिक भागीदारीतून घटना ?
फिर्यादी रूपेश बाजीराव पवार आणि चिपळूण येथील अश्विन मोरे यांची (कोळबांदरा, ता. दापोली) येथील चिरेखाण व्यवसायामध्ये भागीदारी होती.
गेली दोन वर्षे या दोघांमध्ये इस्टेटसंबंधी मतभेद होते आणि सतत वादही होत होते. त्यावरून त्यांचे भांडणही झाले होते. हे भांडण मिटविण्याचे प्रयत्न झाले.
मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. यातूनच आपल्यावर मारेकरी पाठविल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mercenary abducted, rescued in Dapoli taluka; Six suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.