हरिनामातून दिला जातोय ‘पाणी बचती’चा संदेश

By admin | Published: March 22, 2016 12:29 AM2016-03-22T00:29:14+5:302016-03-23T00:21:52+5:30

आज जागतिक जलदिन : वायफळ बतावणीला भजनीबुवांकडून लगाम, पाण्याबाबत प्रबोधनामुळे रसिकांमधून स्वागत--लोकमत विशेष

The message of 'Water saving' is being given in Hariñama | हरिनामातून दिला जातोय ‘पाणी बचती’चा संदेश

हरिनामातून दिला जातोय ‘पाणी बचती’चा संदेश

Next

सिद्धेश आचरेकर -- मालवण --भजनी बुवांनी भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे. हे तत्व कायमस्वरूपी अंगीकारल्यास काही भजन रसिकांची मानसिकता नक्कीच बदलेल. सध्या महाराष्ट्राला भीषण पाणी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांवर आलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी कोरडी होळी खेळा, शक्यतो पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर भजनी बुवा आपल्या डबलबारीच्या सामन्यातून ‘पाणी बचती’वर गजर रचून भजन रसिकांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सामाजिक भान जपत आहेत.
भजनाची खरी ओळख ही नामस्मरणाबरोबर समाजप्रबोधनाची असते. शेकडो वषार्पूवीर्ची संत परंपरा जोपासत कोकणातील भजनी बुवांनी महाराष्ट्रसह इतर राज्यात वेगळा ठसा निर्माण केला आहे. मधल्या काळात बुवांकडून भजनाचा पाया ढासळला होता. मात्र वृत्तपत्रातील बातम्यांनी भजनातील अश्लीलता तसेच वायफळ बतावणीवर टीकेची झोड उठविल्याने अलीकडील काही महिन्यात भजनी बुवांनी समाजप्रबोधनाची कास धरली आहे. त्यामुळे भजन क्षेत्राला भविष्यात वेगळाच रंग चढेल यात शंका नाही!
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ भजनी बुवा तथा कुडाळ भजन संघटनेचे अध्यक्ष मोहन कदम यांच्यावतीने आयोजित डबलबारी सामन्यात बुवा समीर कदम आणि बुवा अनिल पांचाळ या दोन्ही युवा बुवांनी रसिकांना सामाजिक बांधिलकीचे भान देतानाच 'पाणी बचती'वर लाखमोलाचा संदेश दिला आहे. भारतात सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात पाण्याची बेसुमार उधळपट्टी होते. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बुवा समीर कदम रसिकांचे मनोरंजन करत समाजप्रबोधनही करत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच काही अंशी कोकणपट्ट्याला दुष्काळाच्या झळा आतापासून बसण्यास सुरुवात झाली आहे. भजनाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचे संदेश दिले जात असून त्यामुळे सूज्ञ रसिकांतून भजनी बुवांचे स्वागत होत आहे.


‘लोकमत’कडून भजनाबाबत समाज प्रबोधन
युवा बुवांनी सामाजिक चळवळीचे भान लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश दिला याबद्दल आयोजक मोहन कदम यांनी आभार व्यक्त करत अशाच पद्धतीने नवख्या बुवांनी समाजप्रबोधानाच्या माध्यमातून भजन कला जिवंत ठेवावी. तसेच होळी सण साजरा करताना पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा. दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोरडी होळी खेळण्याचा संदेश दिला. तसेच ‘लोकमत’ने भजन क्षेत्रातील विविध बारकावे चित्रित करताना भजनातील अनावश्यक बाबींवर आवाज उठविला आहे.
- मोहन कदम,
ज्येष्ठ भजनी बुवा, कुडाळ

सिंधुदुुर्गला भजनाची मोठी परंपरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजनाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावातील वाडीवाडीत भजनी मेळे आहेत. हे भजनी मेळे समाजप्रबोधनाचे कार्य गेली कित्येक वर्षे करीत आहेत.
डबलबारी भजनाचे सामने प्रत्येक भागात होतात. त्यामुळे बुवांनी मनावर घेतल्यास ते प्रबोधन करू शकतात.
भविष्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता भजनातून पाणी वाचवण्याचा संदेश भजनीबुवांनी दिला तर ते विधायक कार्य ठरणार आहे.

Web Title: The message of 'Water saving' is being given in Hariñama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.