महिलांच्या नृत्याबरोबरच ‘बेटी बचाओ’चा संदेश

By admin | Published: March 11, 2017 09:09 PM2017-03-11T21:09:31+5:302017-03-11T21:09:31+5:30

भंडारी महिला मंडळ : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कार्यक्रम; करमणूक, मनोरंजनातून उद्बोधन

Messages of 'Beti Bachao' with women's dancing | महिलांच्या नृत्याबरोबरच ‘बेटी बचाओ’चा संदेश

महिलांच्या नृत्याबरोबरच ‘बेटी बचाओ’चा संदेश

Next

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी मार्गदर्शन, करमणूक, मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाना सुर्वे स्कूलच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाकरिता कित्ये भंडारी समाज महिला मंडळाच्या संस्थापिका व अध्यक्षा उमा हडकर, खजिनदार उर्मिला आजगांवकर तसेच विख्यात आर्कि टेक्चर भालचंद्र हडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कल्पिता सुर्वे यांच्याहस्ते करण्यात आली. यानिमित्त घेण्यात आलेली पाककला स्पर्धा व फनी गेम्सचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. पाककला स्पर्धेत पूजा मूरकर प्रथम, समिता शेट्ये द्वितीय तर विशाखा पिलणकर यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. तसेच ग्रुपडान्समध्ये आकार लेडीज स्पेशल ग्रुपने प्रथम, राखी भोळे ग्रुपने द्वितीय व आर्या भोळे / इशा भोळे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.
फॅन्सी ड्रेसमध्ये प्रथम क्रमांक आराधना ग्रुप, झाडगाव तर द्वितीय क्रमांक सुस्मिता सुर्वे यांनी पटकावला. संतोष मयेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या भाटकर, विजया भाटकर, अस्मिता चवंडे, उषा कीर, सुधा बिर्जे, विनया भाटकर, आदिती मयेकर, आरती तोडणकर, स्मिता भिवंदे, संपदा तळेकर, राजश्री शिवलकर, ज्योती तोडणकर, स्वाती मयेकर, सुस्मिता सुर्वे, सोनल सुर्वे, रंजना कीर, उर्मिला तळेकर, रंजना विलणकर, राखी भोळे, सत्यवती बोरकर आदींचे सहकार्य लाभले. प्राजक्ता रुमडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’
महिलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संदेश देण्यात आला. यातून मुलींच्या घटत्या संख्येबाबत प्रबोधन करण्यात आले.

Web Title: Messages of 'Beti Bachao' with women's dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.