एमएच-सीईटी प्रवेश परीक्षा ११ मे रोजी
By admin | Published: April 22, 2017 01:42 PM2017-04-22T13:42:07+5:302017-04-22T13:42:07+5:30
परीक्षेस २ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्रवेश
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी : दि. २१ : सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरीता अभियांत्रिकी-तंत्रशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या एमएच-सीईटी प्रवेश परिक्षा गुरुवार दिनांक ११ मे २0१७ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिली.
या प्रवेश परीक्षांच्या नियोजनाबाबत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळे, विभाग प्रमुख अणुविद्युत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संजय चोपडे, जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे, शिक्षणाधिकारी प्राथमिकचे एस.बी. शिखरे, सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी डी. एन. गोलतकर आदी उपस्थित होते.
या परीक्षा कणकवली येथील एस.एस.पी.एम.कॉलेज आॅफ इंजिनियरींग कणकवली, कणकवली कॉलेज, विद्यामंदीर माध्यमिक प्रशाला, व सेंट उसुर्ला स्कूल या केंद्रावर घेण्यात येणार असून या परीक्षेस २ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.