एमएचटी- सीईटी परीक्षा ११ मे रोजी

By admin | Published: May 9, 2017 06:29 PM2017-05-09T18:29:01+5:302017-05-09T18:29:01+5:30

सिंधुदुर्गात मनाई आदेश लागू

The MHT-CET Exam on May 11 | एमएचटी- सीईटी परीक्षा ११ मे रोजी

एमएचटी- सीईटी परीक्षा ११ मे रोजी

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : शैक्षणिक वर्ष २0१७-१८ मध्ये वर्ष अभियांत्रिकी-तंत्रशास्त्र आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी- सीईटी २0१७ ही परीक्षा गुरुवार दिनांक ११ मे २0१७ रोजी सकाळी ९.00 ते सायंकाळी ५.00 या वेळेत नमूद केलेल्या शाळा-महाविद्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी येताना काळ्या शाईचे बॉल पॉईंटपेन, प्रवेश पत्र (अडमिटकार्ड) , रिसीट कम आयडंटी कार्ड (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड) हे साहित्य घेऊन येण्याचे आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना कॅलक्युलेटर, लॉगटेबल, मोबाईल फोन, पेजर तसेच इतर अनधिकृत दुरसंचार साधने सोबत आणू नयेत. विद्यार्र्थ्यानी परीक्षा केंद्रावर दिनांक ११ मे २0१७ रोजी सकाळी ९.१५ वाजता उपस्थित रहावे. परीक्षेच्या केंद्राबाबत अथवा परीक्षा क्रमांकाबाबत विद्यार्थ्यांनी किंवा त्यांचे पालकांना काही शंका आल्यास निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. परीक्षा केंद्राजवळ कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागु करणेत आला आहे.

परीक्षेची बैठक व्यवस्था

कणकवली कॉलेज-कणकवली : ब्लॉक-१ : केंद्र टइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३0000१ पासून ते २३00४५६ पर्यंत (एकूण ४५६)
ब्लॉक - २ : केंद्र टइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३00४५७ पासून ते २३00८१६ पर्यंत (एकूण ३६0),
ब्लॉक -३, केंद्र टइ, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३00८१७ पासून ते २३0१0८७ पर्यंत (एकूण २७१).
एस. एम. हायस्कूल-कणकवली : केंद्र इ, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३२000१ पासून ते २३२0२८८ पर्यंत (एकूण २८८).
विद्यामंदीर माध्यमिक प्रशाला : कणकवली केंद्र इइ, माध्यम इंग्रजी- मराठी, परीक्षा क्रमांक २३२0२८९ पासून ते २३३0६४८ पर्यंत (एकूण ३६0).
एस. एस. पी. एम. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग : कणकवली केंद्र , माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३४000१ पासून ते २३४0४८0 पर्यंत (एकूण ४८0 )
एस. एस. पी. एम. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग: कणकवली केंद्र, माध्यम इंग्रजी-मराठी, परीक्षा क्रमांक २३४0४८१ पासून ते २३४0७१५ पर्यंत (एकूण २३५)

Web Title: The MHT-CET Exam on May 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.