कोकण रेल्वेतील मान्यता प्राप्त संघटनेकडून कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम - मिलिंद तुळसकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 08:12 PM2018-01-21T20:12:50+5:302018-01-21T20:13:20+5:30

कोकण रेल्वे मध्ये सन 2007 ते 2012 या कालावधीत तसेच गेली अडीच वर्षे मान्यता प्राप्त म्हणून काम करणाऱ्या संघटनेने कामगार हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. याउलट कोकण रेल्वे कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम त्यांनी केलेले आहे.

Milk Tulaskar's work for blinding the workers: From a recognized organization of Konkan Railway | कोकण रेल्वेतील मान्यता प्राप्त संघटनेकडून कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम - मिलिंद तुळसकर

कोकण रेल्वेतील मान्यता प्राप्त संघटनेकडून कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम - मिलिंद तुळसकर

Next

 कणकवली - कोकण रेल्वे मध्ये सन 2007 ते 2012 या कालावधीत तसेच गेली अडीच वर्षे मान्यता प्राप्त म्हणून काम करणाऱ्या संघटनेने कामगार हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. याउलट कोकण रेल्वे कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम त्यांनी केलेले आहे. अशी टिका करतानाच कोकण रेल्वे कामगारांच्या प्रकाशमान भविष्यासाठी आपली संघटनाच एकमेव पर्याय असल्याचे कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यानी येथे सांगितले.

  कणकवली  येथील भाजप संपर्क कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघाचे सरचिटणीस गणेश पार्टे , भारतीय मजदूर संघाचे भगवान उर्फ़ बाळा साटम , हरीश जनक उपस्थित होते.यावेळी बोलताना मिलिंद तुळसकर म्हणाले, भारतीय मजदूर संघाशी सलग्न असलेला कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघ  कोकण रेल्वे कामगारांच्या हितासाठी काम करीत आहे. कोकण रेल्वेतील मान्यताप्राप्त संघटना ठरविण्यासाठी 2015 साली  निवडणुक झाली . या निवडणुकीत फक्त सहा मतानी निवडून आलेल्या व मान्यता प्राप्त झालेल्या संघटनेने कोकण रेल्वेवर खाजगीकरण, कंत्राटीकरण यांना सहमती दर्शविणे,  भूमिपुत्र विरहित भरती प्रक्रिया, कामगारांच्या बेकायदेशीर बदल्या , पदोन्नत्ती भरती वरती बंदी , आपल्याच समर्थकांची बढ़ती व बदली करणे असे धोरण स्वीकारले आहे.

    कामगारांच्या अनेक सुविधा कमी करत कोकण रेल्वे कामगाराना अंधाराच्या खाईत लोटले आहे. मी मान्य करून घेतलेले अनेक कामगारांचे निर्णय ही मान्यताप्राप्त संघटना राबवू शकलेली नाही. गृह कर्जावरील व्याज सबसिडीचा लाभ देण्यात तसेच शंभर टक्के स्वेच्छानिवृत्ति मान्य करून घेण्यात ही संघटना अयशस्वी ठरली आहे.  तसेच ट्रॅकमन- पॉइंटसमन यांना 2400 रूपये ग्रेड पे देण्यात अयशस्वी ठरली आहे. ग्रुप डी मधील बारावी पास पात्रता प्राप्त कर्मचाऱ्यांना ज्यु.टी.सी. म्हणून त्यांच्या माथी 2000 रूपये ची ग्रेड पे मारून त्यांच्या हक्काची 2400 रूपये ग्रेड पे देण्यात ही संघटना अयशस्वी ठरली आहे.

 त्यामुळे कामगार हिताच्या अनेक विषयात अयशस्वी ठरलेल्या सध्याच्या कोकण रेल्वेतील मान्यता प्राप्त संघटनेला कायमचे हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. कामगारांना 24 जानेवारी रोजी ही संधी प्राप्त होणार आहे. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करीत आहे.कोकण रेल्वे निर्मितीत व संचालनातील विशेष योगदान लक्षात घेवून कोकण रेल्वे कामगारांना व्हीआरस स्किम मध्ये 20 टक्के वाढीव रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मेडिकल पॉलिसी मध्ये केलेला बदल त्वरीत रद्द करून कामगारहिताची नवीन मेडिकल ज्यात अनावश्यक त्रुटी दूर करून सेवानिवृत्तीनंतर  पण वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळेल अशी तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे कंत्राटी पध्दतीवर चालु असलेली कामगार भरती त्वरीत बंद करून त्याऐवजी विभागीय पदोन्नत्ती देण्यास प्रशासनास भाग पाडण्यात येईल . अशा अनेक कामगार हिताच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही लढा सुरु केला आहे.याचा विचार  करून कोकण रेल्वे कामगारानी कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघाला साथ द्यावी. तसेच आपला उत्कर्ष साधावा असे आवहनही मिलींद तुळसकर यांनी यावेळी केले.
     

कामगारांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न !

दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाच्या कामात कोकण रेल्वेवर वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना डावलूून खुल्या बाजारातून होत असलेली अधिकारी वर्गाची भरती बंद पाडून कोकण रेल्वेच्या इंजिनिअर्सना पदोन्नत्ती देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. तसेच स्टेशन मास्तर व अन्य कामगारांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठीही त्यांच्या जागा वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे मिलिंद तुळसकर यानी यावेळी सांगितले.

Web Title: Milk Tulaskar's work for blinding the workers: From a recognized organization of Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.