वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 01:48 PM2020-05-19T13:48:31+5:302020-05-19T13:50:21+5:30

विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

Millions lost due to torrential rains | वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

Next
ठळक मुद्देवादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले शेतकऱ्यांवर कोरोनानंतर पावसाचे संकट; नुकसानीची मागणी

बांदा : विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विलवडे गावातील कलिंगड, पालेभाज्या, काकडी, दोडकी, वांगी, भेंडी या उत्पादनांना बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांचा माल जागेवर कुजून गेला. त्यातच आता वादळी पावसाने दणका दिल्याने केळी बागायती, आंबा, काजू व इतर पिकांचे नुकसान झाले.

सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्याने लोकांनी मिरच्या, भुईमूग, कडधान्ये, कोकम, इतर साहित्य उन्हात वाळत ठेवले होते. त्यांचे वादळी पावसात भिजून नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावर्षी काजू पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळी विजांचा गडागडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.

विलवडे (टेंबवाडी) येथील केळी बागायतीतील १०० हून अधिक केळी घडांचे, पोफळी व इतर पिकांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत नारायण सावंत व विठ्ठल नारायण सावंत यानी सांगितले.

मनोज दळवी, प्रमोद दळवी, श्रीराम सावंत, सूर्यकांत दळवी आदी १० हून अधिक शेतकऱ्यांच्या केळी बागायतींचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

विलवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील तरूण तुंटपुज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे वळला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून गावाचा विकास साधण्यात यशस्वी झाले आहेत.

अपार कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केळी, भाजीपाला व फळबागांबरोबरच कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहे. पण वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
 

Web Title: Millions lost due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.