तळाशील समुद्रात पुन्हा मिनी पर्ससीनची घुसखोरी
By admin | Published: December 11, 2015 12:44 AM2015-12-11T00:44:24+5:302015-12-11T00:49:10+5:30
पुन्हा वाद उफाळणार
मालवण : आचरा येथील मच्छिमारांमधील राड्यानंतर जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मच्छिमारांच्या संयुक्त बैठकीत समुद्रात निश्चित केलेल्या हद्दीचा गुरूवारी मिनी पर्ससीन ट्रॉलर्सकडून उल्लंघन केल्याचा प्रकार तळाशील समुद्रात घडला.
गुरूवारी सकाळी पाच वाजता खोल समुद्रात मिनी पर्ससीन ट्रॉलर्सकडून घुसखोरी झाली. त्यामुळे या मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमार संतप्त झाले आहेत. त्यांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधला. तसेच पोलीस ठाणे आणि मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनाही माहिती दिली. परंतु गस्ती नौका पोहोचेपर्यंत मिनी पर्ससीन ट्रॉलर्सने वाद होण्याच्या शक्यतेने देवगडच्या दिशेने
पळ काढला. संबंधित अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांना पकडण्याचा पारंपरिक मच्छिमारांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. (प्रतिनिधी)
पुन्हा वाद उफाळणार
दरम्यान, मिनी पर्ससीनधारकांनी हद्दीचे उल्लंघन केले आणि पारंपरिक मच्छिमारांना डिवचल्यामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.