खनिकर्मला ७ कोटीचा महसूल

By admin | Published: January 22, 2015 11:26 PM2015-01-22T23:26:17+5:302015-01-23T00:47:32+5:30

गौणखनिज उत्खनन बंदी : वाळूचे लिलाव रखडल्याने उद्दिष्टपूर्तीवर परिणाम

Mining revenue of 7 crores | खनिकर्मला ७ कोटीचा महसूल

खनिकर्मला ७ कोटीचा महसूल

Next

रत्नागिरी : गौणखनिज उत्खनन बंदीचा फटका जिल्ह्याच्या महसुलावर झाला आहे. जिल्ह्यातील गौणखनिज वसुलीपोटी शासनाच्या २२ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी केवळ ७ कोटी ८४ लाख (३५.६४ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. मात्र, खेड तहसील कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक मजल मारत १ कोटी ३२ लाख ८१ हजार एवढी (१३३ टक्के) वसुली केली आहे. त्याखालोखाल राजापूरने (७५.३८ टक्के) वसुली केली आहे. चालू आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज शुल्क व भुपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, खेड आणि दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर आपल्या उद्दिष्टांपैकी अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. उर्वरित तालुक्यांची वसुली कमी झाली आहे. राजापूर उपविभागीय कार्यालयाची तर केवळ ४.६५ टक्के इतकीच वसुली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला ६ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख ९३ हजार रुपये (१०.९९ टक्के) एवढीच वसुली झाली आहे. डिसेंबर २०१४पर्यंत केलेल्या या वसुलीत खेड तहसील कार्यालयाने अव्वल स्थान राखले आहे. सर्वांत कमी वसुली राजापूर तालुक्यातून झाली आहे. डिसेंबर महिन्यात मात्र सर्वच तालुक्यांनी जोर लावलेला दिसून येतो. या एकाच महिन्यात १ कोटी २२ लाख ६९ हजार इतकी वसुली झाली आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमधील गौणखनिज उत्खननावरील बंदी आधीच उठविण्यात आली आहे. उर्वरित लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या तालुक्यांवरील बंदीही डिसेंबरमध्ये उठविण्यात आली आहे. मात्र, त्याचा परिणामही या विभागाच्या उद्दिष्टपूर्तीवर झाला आहे. वाळूवरील बंदीही २०११ सालापासून कायम आहे. त्यामुळे त्याचे लिलावही थांबले आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. यंदाही वाळूचा लिलाव न झाल्याने महसूल कमी मिळाला आहे.
असे असले तरी खेड तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळवला आहे. त्याखालोखाल राजापूर तालुक्यानेही क्रमांक पटकावला आहे. त्यामानाने उर्वरित तालुक्यांमध्ये खनिकर्म विभागाला कमी महसूल प्राप्त झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (प्रतिनिधी)

२२ कोटींचे उद्दीष्ट--खेडमध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली.
लांजा, गुहागर, रत्नागिरी, मंडणगडची वसुलीही कमी.
आर्थिक वर्षात गौणखनिज वसुली, शासकीय वसुली आणि थकबाकी, चालू दंड, अर्ज फी व भूपृष्ठ भाडे आदींपोटी जिल्ह्याला २२ कोटींचे उद्दिष्ट. दापोली उपविभागीय कार्यालयाने डिसेंबरअखेर अनुक्रमे ७७ आणि ५२ टक्के केली उद्दिष्टपूर्ती.

डिसेंबरअखेर केलेली वसुली
उपविभागउद्दिष्टवसुली
खेड१ कोटी७७,०१,०००
रत्नागिरीदीड कोटी२४,८२,०००
चिपळूणदीड कोटी३५,६८,०००
दापोलीदीड कोटी७७,३५,०००
राजापूरदीड कोटी६,९७,०००
तहसील स्तर
मंडणगड१ कोटी२३,५०,०००
दापोली१ कोटी३९,९५,०००
खेड१ कोटी१,३२,८१,०००
चिपळूण१ कोटी४६,५५,०००
संगमेश्वर१ कोटी३८,७९,०००
गुहागर१ कोटी२०,८३,०००
रत्नागिरी१ कोटी२७,६२,०००
राजापूर१ कोटी७५,३८,०००
लांजा१ कोटी९०,९५,०००
जिल्हाधिकारी ६ कोटी६५,९३,०००
कार्यालय

एकूण२२ कोटी ७,८४,१३,०००

Web Title: Mining revenue of 7 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.