चंद्रकांत पाटलांनी सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला; विनायक राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 04:01 PM2022-10-13T16:01:52+5:302022-10-13T16:02:13+5:30
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासंदर्भात ही क्लिप व व्हिडिओ व्हायरल होत असतानाच यावर खासदार विनायक राऊत यांनी मराठा समाजामध्ये फक्त पक्ष स्वार्थ साधून चंद्रकांत पाटील यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कार्यकर्त्यांना केवळ हे खरेदी करण्याचं काम आहे. सध्या मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीवरून बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे समोरासमोर आले आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार टीकास्त्र सुरू असून आज विनायक राऊत यांनी सुद्धा विरोधकांचा समाचार घेतला. ऋतुजा लटके यांना केवळ आणि केवळ उमेदवारी मिळू नये, यासाठी या सरकारचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.