मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

By अनंत खं.जाधव | Published: March 11, 2023 04:38 PM2023-03-11T16:38:53+5:302023-03-11T16:39:28+5:30

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा

Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray Aditya Thackeray | मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

googlenewsNext

सावंतवाडी : आम्हाला पन्नास खोके म्हणता मग एवढी वर्षे तुम्ही काय करत होता. मुंबईतील खोके बंद झाल्यानेच उद्धव ठाकरेची चिडचिड होत आहे. पण आता गप्प बसणार नाही खोक्याना त्याच भाषेत उत्तर देणार असून मागील पाच वर्षांत माझी मालमत्ता विकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष चालवला त्यावेळी खोके कुठे गेले असा सवाल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करत ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.

ते शिवसेना शिंदे गटाकडून सावंतवाडीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, माजी खासदार सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, सचिन वालावलकर, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, अनारोजीन लोबो, सचिन देसाई, प्रेमानंद देसाई, सुनिल डुबळे उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, आमच्यावर खोक्याचे आरोप करता मग तुम्ही आतापर्यंत घेतलेले खोके कुठे ठेवले. मुंबई मधून किती खोके मिळत होते. पदे द्यायला किती खोके घेता असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. ठाकरे पिता-पूत्र जेव्हा आमच्यावर टिका करतात त्यावेळी याच्याबाबत सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा सल्लाही केसरकरांनी दिला. तसेच सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना आडाळी येथे गरज नसताना धरण बांधण्यात आले याला जबाबदार कोण आणि लोक रस्त्यावर उतरले असते तर काय झाले असते याचा विचार करा असे म्हणत देसाईंवरही टीकास्त्र सोडले. यापुढे जिल्हा परिषद निहाय दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रविंद्र फाटक म्हणाले, पक्ष संघटना वाढवली तरच आपणास याचा फायदा होणार आहे. प्रत्येकाने तळागाळात जाऊन संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. मी सतत या भागाचा दौरा करेन आणि याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या जिल्ह्यात येण्याची विनंती करेन असेही सांगितले.

सुधीर सावंत म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. अनेक विकासात्मक कामे त्यांच्या हातून मागील सहा महिन्यात या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन सावंत यांनी केले.

दरम्यान, आजगाव सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर या निमित्ताने महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख म्हणून रविंद्र फाटक यांची निवड झाल्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Minister Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.