आंबोलीचे निसर्गसौंदर्य पाहून महसूल राज्यमंत्री भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:02 IST2020-11-04T19:00:27+5:302020-11-04T19:02:25+5:30
abdulsattar, minister, deepakkesarkar, ambolihillstation शासनाने जांभा दगड बंदी उठविली असून लवकरच वाळू लिलाव निर्णयदेखील होईल, असा विश्वास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान, आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे ही देणगी आहे असे सांगत आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याची पाहणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. यावेळी आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.
सावंतवाडी : शासनाने जांभा दगड बंदी उठविली असून लवकरच वाळू लिलाव निर्णयदेखील होईल, असा विश्वास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्रीअब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान, आंबोलीचे निसर्गसौंदर्य, धबधबे ही देणगी आहे असे सांगत आंबोली, गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नांसदर्भात चर्चा करण्यासाठी महसूल राज्यमंत्रीअब्दुल सत्तार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते. त्यानंतर त्यानी आंबोली धबधब्याचीही पाहणी केली.
राज्यमंत्री सत्तार म्हणाले, आंबोली व गेळे येथील जमिनीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सकारात्मक आहेत. यामुळे आमदार दीपक केसरकर यांची चिकाटी फळाला येईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले.
जमिनी नावावर झाल्यानंतर फायदा
आंबोली बाजारपेठ वन लागली आहे. तो प्रश्नदेखील लवकरच मार्गी काढला जाईल. आंबोलीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जमिनी नावावर झाल्यानंतर फायदा होईल. केंद्र व राज्य सरकारचा निधीदेखील लोकांना वापरता येईल, असे सत्तार म्हणाले. या जमिनी वाटप करताना डीपी प्लॅन तयार होणार आहे.