नुकसानीबाबत मंत्र्यांची लवकरच भेट घेणार, स्टॉलधारकांच्या बैठकीत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 01:47 PM2017-11-26T13:47:32+5:302017-11-26T13:48:46+5:30

कणकवली : शहरातील महामार्गालगतचे कित्येक वर्षे व्यवसायासाठी उभारण्यात आलेले स्टॉल महामार्ग चौपदरीकरणात हटविले जाणार आहेत. यामुळे ४० ते ५० स्टॉलधारकांची कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत.

Ministers will meet soon to discuss the loss, the resolutions in the stall holders meeting | नुकसानीबाबत मंत्र्यांची लवकरच भेट घेणार, स्टॉलधारकांच्या बैठकीत ठराव

नुकसानीबाबत मंत्र्यांची लवकरच भेट घेणार, स्टॉलधारकांच्या बैठकीत ठराव

googlenewsNext

कणकवली : शहरातील महामार्गालगतचे कित्येक वर्षे व्यवसायासाठी उभारण्यात आलेले स्टॉल महामार्ग चौपदरीकरणात हटविले जाणार आहेत. यामुळे ४० ते ५० स्टॉलधारकांची कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. चौपदरीकरणातील संपादित झालेल्या जमिनी व मालमत्तेचा मोबदला मिळणार आहे. परंतु हे स्टॉल अधिकृत नसल्याने सहानुभूती दर्शवत स्टॉलच्या होणा-या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळावी, या मागणीसाठी स्टॉलधारक तसेच लोकप्रतिनिधींची बैठक शुक्रवारी रात्री ८ वाजता गांगोमंदिर येथे झाली. यावेळी संबंधित प्रशासनाला निवेदन देण्याचे व मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचे ठरले.

यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, वाहतूक आघाडीप्रमुख शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव हे उपस्थित होते. गेल्या दोन पिढ्या हे स्टॉलधारक महामार्गावर आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करीत आहेत. चौपदरीकरणात जात असलेल्या अधिकृत जमिनी व मालमत्तेचा मोबदला मिळणार आहे. परंतु हे स्टॉल अधिकृत नसून त्यांच्या होणा-या नुकसानीचा मोबदला मिळावा. अन्यथा स्टॉलधारकांना अन्य ठिकाणी प्रस्तापित करावे असा एकमुखी निर्णय स्टॉलधारकांनी घेतला.

आवाज उठविल्याशिवाय अधिका-यांपर्यंत मागण्या पोहोचणार नाहीत. ज्याप्रमाणे झाडांचे भविष्यातील २५ वर्षे आयुर्मान तसेच त्यापासून मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन मूल्यमापन केले. त्याचप्रमाणे स्टॉलधारकांनाही सहानुभूती दर्शवत नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे . यासाठी संबंधित प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन व त्यासोबत आपल्या स्टॉलचे छायाचित्र तसेच इतर स्टॉलसंबंधी कागदपत्रे असल्यास ती जोडून द्यावीत, असे नगरसेवक सुशांत नाईक, शिशिर परुळेकर, सुजित जाधव यांनी सांगितले. यावेळी चानी जाधव, पांडू वर्दम, सागर वारंग आदी स्टॉलधारक उपस्थित होते.

खासदार, मंत्र्यांशी चर्चा करणार
२७ नोव्हेंबर रोजी खासदार विनायक राऊत व ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा दौºयावर येणाºया बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मोबदला मिळणेबाबत चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Ministers will meet soon to discuss the loss, the resolutions in the stall holders meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.