सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाकडून उच्च न्यायालयाची दिशाभूल; जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत यांचा आरोप

By अनंत खं.जाधव | Published: October 4, 2023 06:07 PM2023-10-04T18:07:37+5:302023-10-04T18:08:00+5:30

मायनिंग लाॅबीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र 

Misled High Court by Conservator of Forests of Sindhudurg; Allegation of Jayendra Parulekar, Sandeep Sawant | सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाकडून उच्च न्यायालयाची दिशाभूल; जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत यांचा आरोप

सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाकडून उच्च न्यायालयाची दिशाभूल; जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत यांचा आरोप

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 पैकी 17 गावातील ग्रामस्थांनी आपल्याला इको सेन्सेटिव्ह नको असा एकदा ठराव देऊनही पुन्हा एकदा नव्याने ठराव घेण्यात आला असून असा ठराव घेणे कायद्यात नसताना वनविभागाने राजकीय दबावा खाली  येऊन ठराव घेतले.व खोटे प्रतिज्ञापत्रात उच्च न्यायालयात दाखल केले आहे.ही सरळ सरळ न्यायालयाची फसवणूक आहे.

त्यामुळे या विरोधात आम्ही जनतेत जाऊन दाद मागणार असून न्यायालयाच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आणून देणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डाॅ.जयेद्र परुळेकर व सामाजिक कार्यकर्ते संदिप सावंत यांनी दिली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मायनिंग लॉबी सक्रिय होत असल्याचा आरोप केला.

सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात असणारा सहयाद्री पट्टा मायनिंपासून वाचविण्यासाठी गेली चौदा वर्षेे आम्ही लढा देत आहोत असे असताना सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकीशोर रेड्डी यांनी उच्य न्यायायलयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बुध्दीभेद करणारी माहीती दिली आहे या मागे काही राजकीय लोंकासह जमिन विक्री करणार्‍या टोळक्याचा हात असण्याची शक्यता आहे असा दावा डॉ परुळेकर यांनी केला आहे
उपवनसंरक्षक यांनी प्रतिज्ञापत्रात दोन्ही तालुक्यातील  दोन गावे वगळणारी माहिती न्यायायलयात दिली त्या शिवाय सह्याद्रीच्या पट्यात फक्त दोन गावात पट्टेरी वाघाचे अस्तीत्व दिसले असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला आहे.

इकोस 17 गावांनी इकोसेन्सेटिव्ह झोन नको म्हणून समितीला सांगितले त्यामुळे या झोनची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे अशा प्रकारच्या अनेक चूकीच्या गोष्टी त्यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्या आहेत त्यामुळे या विरोधात आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून प्रत्येक गावात जावून जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच उपवनसंरक्षक यांनी न्यायायलयाची दिशाभूल केली असून त्याबाबत ही न्यायायलया ला पुराव्यासहित माहिती देण्यात येणार असे ही परुळेकर व सावंत यांनी सांगितले.

 सिंधुदुर्गच्या जमिनीत सोन्याच्या खाणी दिसल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या भू गर्भात सोन्याच्या खाणी असल्याचे म्हटले होते. पण त्यांना माहित नाही आमचा सिंधुदुर्ग सोन्याचा खजिना आहे. तुम्ही किती मायनिंग लाॅबी उतरविण्याची भाषा केली तरी या खजिन्याला अशा प्रकारे हात लावू शकणार नाही अशी टिका ही परुळेकर यांनी केली.

Web Title: Misled High Court by Conservator of Forests of Sindhudurg; Allegation of Jayendra Parulekar, Sandeep Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.