महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 6, 2023 04:20 PM2023-07-06T16:20:58+5:302023-07-06T16:27:21+5:30

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ...

Mismanagement of Mahavitaran, Bull died by touching electricity wires, farmer demands compensation | महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

महावितरणचा गलथान कारभार; वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू, शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : मळगाव-कुंभारवाडी येथे वीज तारांचा स्पर्श होऊन बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. यात शेतकरी न्हानू दशरथ खडपकर (रा . कुंभारवाडी) यांचे नुकसान झाले. शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार, वायरमन प्रितेश हळदणकर, संतोष गावंकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती पंचम खेमराजचे निवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी महावितरणला दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. 

याबाबत पशुधन अधिकारी, कृषी अधिकारी, व तलाठी यांना कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर महावितरणचे ओरोस सिंधुदुर्ग येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार असून बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल अशी माहिती लोहकरे यांनी दिली.

दरम्यान महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या कमजोर झाल्या असल्याची माहिती आपण वेळोवेळी दिली होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला. नशिबाने शेतकरी वाचला अन्यथा मोठा प्रसंग उद्भवला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी गणपत शिरोडकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Mismanagement of Mahavitaran, Bull died by touching electricity wires, farmer demands compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.