गहाळ झालेली रक्कम, दागिने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 10:43 AM2019-05-08T10:43:24+5:302019-05-08T10:44:56+5:30
कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचा-यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख २0 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली.
सिंधुदुर्गनगरी : कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचा-यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख २0 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली.
खालापूर टोल नाका येथे विशेष अभियान असल्याने कसाल महामार्गपोलिस विभागातील एकनाथ मुसळे , जयशंकर धुरी,सचिन करवंजे हे तीन पोलीस कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान, नरेश राजपुरोहित (रा. राजस्थान) हे आपल्या परिवारा सह बंगलोर ते राजस्थान असे चारचाकी वाहनाने (जीए 0५ डी ८७0५) प्रवास करीत असताना ते बोरघाट येथे काही कामानिमित्त थांबले. पुन्हा पुढील प्रवासाला सुरूवात केली असता वाहनातून सोन्याचे दागीने, मंगळसूत्र व रोख रक्कम २0 हजार रुपये असलेली पर्स एक्सप्रेस-वे वर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबतची माहिती महामार्गावरील खालापुर टोल नाका येते दिली. लागलीच सहाय्यक फौजदार जयशंकर धुरी व हेड कॉन्स्टेबल सुनिल चौधरी, एकनाथ मूसळे व सचिन करवंजे यांनी पर्स व दागीने शोधण्यासाठी मोहीम राबविली असता त्यांना घाटात रात्री एक वाजता सदर पर्स (दागीने) व पैसे मिळाले. ही रक्कम व ऐवज नरेश राजपुरोहित यांच्या ताब्यात देण्यात आली. पोलीसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.