..अखेर बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलीस ठाण्यात हजर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झाले होते बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 04:01 PM2022-01-03T16:01:41+5:302022-01-03T16:02:12+5:30

निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

Missing Pramod Waingankar appears at police station Sindhudurg District Bank went missing on the eve of elections | ..अखेर बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलीस ठाण्यात हजर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झाले होते बेपत्ता 

..अखेर बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलीस ठाण्यात हजर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झाले होते बेपत्ता 

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झालेले प्रमोद महिपत वायंगणकर हे अखेर समोर आले आहेत. वायंगणकर हे आज, सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले. यामुळे वायंगणकरांच्या बेपत्ता झालेल्या चर्चेना पुर्ण विराम मिळाला.

कणकवली तालुक्यातील तळेरे येथील प्रमोद महिपत वायंगणकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार होते. ते जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार २० डिसेंबर रोजी देण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे  विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

मात्र, वायंगणकर हे सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाले. तसेच त्यानी मी स्वतःच कर्जाला कंटाळून घरातून निघून गेलो होतो. माझे कोणीही अपहरण केले नव्हते. अशी कबुली दिली आहे. रविवारी  रात्री ते पुण्याहून कणकवलीला यायला निघाले. तसेच सोमवारी त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये हजर होत आपल्या ठावठिकाण्याबाबत  माहिती दिली. माझ्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. 

Web Title: Missing Pramod Waingankar appears at police station Sindhudurg District Bank went missing on the eve of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.