आमदार नितेश राणे सावंतवाडीत दाखल, जिल्हा कारागृहात जामिनाची पुर्तता करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:47 PM2022-02-10T13:47:04+5:302022-02-10T15:28:10+5:30
जामीन मंजूर झाल्यानंतर नितेश राणेंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला
सावंतवाडी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांची ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे हे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले आहेत.
राणे हे कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल होते. तेथून ते कणकवली मार्गे सावंतवाडीत दाखल झाले येथे ते जामिनाची पूर्तता करणार आहेत. मात्र येथून कुठे जाणार याची अद्याप निश्चिती नाही. राणे यांना कणकवली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राणे येणार म्हणून कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आज त्यांना सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.