देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रता नाही - नितेश राणे 

By सुधीर राणे | Published: August 5, 2024 06:09 PM2024-08-05T18:09:51+5:302024-08-05T18:11:17+5:30

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे ...

MLA Nitesh Rane criticizes Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रता नाही - नितेश राणे 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रता नाही - नितेश राणे 

कणकवली: चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हे अशाच पद्धतीचे सडका आंबा आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले आहे. आता कार्यतत्पर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १०० पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांना ७० आमदार सुद्धा निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे राजकारणातील सडका आंबा असलेल्या संजय राऊत यांची समाजाभिमुख काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथे ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. 

राणे म्हणाले, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे कार्य पहावे. विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी शरद पवार यांना अदानी बदलची आपली भूमिका स्पष्ट करायला सांगावी. उद्धव ठाकरे यांच्या  भूमिकेची दखल न घेण्याचे काम शरद पवार हे कृतीतून करत आहेत. यावर संजय राऊत यांनी बोलावे. त्यांना कधी तरी त्याबाबत जाब विचारावा.

..त्याचे पुरावे आता दाखवावे लागतील

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात फडणवीस यांनी आरोप केले होते. तेव्हा सचिन वाझे यांच्यावर करवाई करायला तो लादेन आहे का ?  असे उद्धव ठाकरे यांनी विचारून कोणतीच कारवाई केली नव्हती. सचिन वाझेंना कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे मला आता दाखवावे लागतील.

आमचे सरकार धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार 

मुंबईला लुटण्याची हिम्मत कोणी करणार नाही. आमचे सरकार पुन्हा येणार आहे. ते धारावीचा प्रकल्प पूर्ण करणार आहे. मॅच फीक्सिंगचे आरोप राज ठाकरेंवर राऊत करीत आहेत. मात्र, राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. 

इस्लामिक देशात वक्फ बोर्डचा कायदा नाही

वक्फ बोर्डचा कायदा फक्त आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी त्याबाबत चांगला निर्णय घेतील,असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Web Title: MLA Nitesh Rane criticizes Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.