आमदारांनी स्वत: केली भात लावणी, वैभव नाईक उतरले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:55 PM2020-06-20T16:55:59+5:302020-06-20T16:57:02+5:30

कुडाळ तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या शेतावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत श्री पद्धतीची भात लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाईक यांनी शेतात उतरत स्वत: मशीन चालवून भात लावणीचे प्रात्यक्षिक केले.

MLAs planted paddy themselves, Vaibhav Naik landed in the field | आमदारांनी स्वत: केली भात लावणी, वैभव नाईक उतरले शेतात

कालेली येथे आमदार वैभव नाईक यांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली.

Next
ठळक मुद्देआमदारांनी स्वत: केली भात लावणी, वैभव नाईक उतरले शेतातकालेली येथे श्री पद्धतीने भात लागवडीचा शुभारंभ

कुडाळ : तालुका कृषी विभागामार्फत कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांच्या शेतावर कृषी यांत्रिकीकरणांतर्गत श्री पद्धतीची भात लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाईक यांनी शेतात उतरत स्वत: मशीन चालवून भात लावणीचे प्रात्यक्षिक केले.

आमदार नाईक यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ कुडाळ- मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कालेली येथील शेतकरी गोविंद बाळकृष्ण परब यांनी घेतलेल्या भात लावणी मशीनच्या सहाय्याने गुरूवारी त्यांच्या क्षेत्रावर भातलावणी करण्यात आली. तसेच कालेली येथील मनोहर परब यांच्या क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली. प्रभाकर घाडी यांच्या क्षेत्रावर काजू लागवडीची पाहणी करण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हेत्रे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, पंचायत समिती सदस्य मथुरा राऊळ, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना विभागप्रमुख रामा धुरी, माजी उपसरपंच कृष्णा धुरी, आनंद नाईक, बळीराम सावंत, विद्या मुंज, कालेली ग्रामसेवक तोरसकर, रवी तुयेकर, राजू कविटकर, विवेक परब, उमेश परब, मंडळ कृषी अधिकारी मोहिनी वाळेकर, निलेश उगवेकर, अंथोनी डिसोझा, धनंजय कदम, निलेश गोसावी, रत्नदीप कावले, पंकज बावीसकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

Web Title: MLAs planted paddy themselves, Vaibhav Naik landed in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.