निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:09 PM2019-06-24T13:09:56+5:302019-06-24T13:13:39+5:30

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

MNS court to go to court for degrading work! | निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!

निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!

googlenewsNext
ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!परशुराम उपरकर यांची माहिती; महामार्गाच्या दुर्दशेची समस्या

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

 परशुराम उपरकर पुढे म्हणाले, प्रांताधिकारी व तहसीलदार कणकवली गडनदी पुलाजवळ महामार्ग ठेकेदाराची वाट पाहत असताना तो वेळेवर येत नाही. यावरून ठेकेदार अधिकारी व प्रशासनाला जुमानत नाही.हे सिद्ध झाले आहे.

श्री गणेश चतुर्थी पूर्वी बांधकाम मंत्री, पालकमंत्री , खासदार आणि सर्व आमदार दुर्दशा झालेल्या महामार्गाची पाहणी करतील आणि छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवतील. मात्र, तरीही महामार्गाचे प्रश्न कायमच राहतील. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी महामार्गाचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहेत. तर प्रशासनाचे या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष दुर्दैवी आहे.

मनसेच्यावतीने आम्ही नविन रस्त्याला पडलेल्या भेगा आणि रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा अनेकवेळा दाखवून दिला आहे. महामार्गाचे निकृष्ट काम मुख्य अभियंत्यांच्याही निदर्शनास आणून दिले आहे. महामार्गावरील पुलाच्या जोडरस्त्यांना टाकलेला मातीचा भराव हा यापुढेही टिकणार नाही. याची जाणीव संबधित अधिकाऱ्यांना करून दिली आहे.

हायवे रोड सेफ्टी तसेच क्वालिटी कंट्रोल एजन्सीला जिल्ह्यातील जनतेचे सोयरसुतक नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही कृती होत नाही . किमान ५० वर्षे तरी टिकणारा रस्ता बांधणे आवश्यक आहे. पण सध्याचा रस्ता ५ वर्षे टिकणेही अवघड आहे.

गणेश चतुर्थीपूर्वी मागील २ वर्षांसारखेच खड्डे महामार्गावर पडणार आहेत. त्यावेळी बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि सर्व आमदार येऊन रस्त्याच्या पाहणीची नौटंकी करतील. मात्र, महामार्गाच्या कामात काहीच सुधारणा होणार नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे. हे मनसे कदापिही खपवून घेणार नाही.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे महामार्गाची दुर्दशा!

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कार्यतत्पर नव्हे तर भ्रष्टाचारी अधिकारी हवे आहेत.
जिल्ह्याला स्त्रीरोगतज्ञ आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. चाकूरकर यांच्यासारख्याची बदली झालेली असताना पालकमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. पालकमंत्री निष्क्रिय असल्यानेच जिल्ह्याचा विकास रखडला असून महामार्गाची दुर्दशा झाली आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

Web Title: MNS court to go to court for degrading work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.