सावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:03 PM2018-10-08T13:03:12+5:302018-10-08T13:05:41+5:30

मनसेतर्फे 9 ऑक्टोबरला सावंतवाड़ी पोलिस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार आहे.अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली .

MNS's Front at Sawantwadi on 9th October: Parshuram Upkar | सावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर

सावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर

Next
ठळक मुद्देसावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर अत्याचार प्रकरणी पोलिसांना विचारणार जाब

कणकवली :सावंतवाडीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई व्हावी. या आरोपींसह लॉज चालकावरही पेटांतर्गत गुन्हा दाखल व्हावा. सरकारतर्फे तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती व्हावी. तसेच वेंगुर्लेतील मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या शिक्षकावर देखील कारवाई व्हावी या मागणीसाठी मनसेतर्फे 9 ऑक्टोबरला सावंतवाड़ी पोलिस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार आहे.अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली .

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे आदी उपस्थित होते.

यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, या निषेध मोर्चामध्ये मनसे नेते शिरीष सावंत, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, प्रवीण मर्गज, राजा चौगुले यांच्यासह मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नागरिक देखील सहभागी होणार आहेत.

मनसेच्या मोर्चाच्या समारोपानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी उपस्थित रहावे. यासाठी त्याना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी घडलेल्या घटनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

सावंतवाड़ी व वेंगुर्ले या दोन्ही घटनातील अल्पवयीन मुलींना शासनाच्या मनोधैर्य योजनेतून दहा लाख रूपये मिळावे. यासाठी पोलिसांनी शासनाजवळ प्रस्ताव पाठवावा अशी मागणी मनसेकडून करण्यात येणार आहे. हा मोर्चा मनसेचा असला तरी सर्व पक्षियानी त्यात सामिल व्हावे असे आवाहनही त्यानी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले, शिवसेना महिला आघाडीचे आम्ही अभिनंदन करतो. कारण त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसून सावंतवाड़ी अत्याचार प्रकरणातील आरोपीना शिक्षा व्हावी म्हणून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच पालकमंत्री निष्क्रिय असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आतातरी पालकमंत्र्यानी स्वपक्षियांचे म्हणणे मनावर घ्यावे आणि आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा करावी .असेही उपरकर यावेळी म्हणाले.

पालकमंत्री जनतेला सुरक्षितता देण्यात अपयशी!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर गृहराज्यमंत्रीही आहेत. मात्र, त्यांच्याच मतदार संघातील सावंतवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो. दुसरीकडे वेंगुर्ले येथे एका शिक्षकाकडून मुलीचे लैंगिक शोषण होते. हा प्रकार पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात होतो. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा . स्वतःचा मतदार संघ असुरक्षित असताना ते जिल्ह्यातील जनतेला सुरक्षतिततेचा विश्वास कसा काय देणार? असा प्रश्न उपस्थित करतानाच ते सर्वार्थाने अपयशी ठरले आहेत. अशी टिकाही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

Web Title: MNS's Front at Sawantwadi on 9th October: Parshuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.