मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:33 PM2020-09-08T15:33:24+5:302020-09-08T15:35:41+5:30

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या.

MNS's Janakrosh Andolan, the chaotic management of the district hospital | मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.

Next
ठळक मुद्देमनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार शासनाची आर्थिक लूट केल्याचाही आरोप

ओरोस : जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओडले तर कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या वस्तू, साधन सामुग्रीची खरेदी झाली. ती चढ्या दराने मंजूर करून शासनाच्या आर्थिक लूट केल्याचा आरोप केला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांची खरेदी बाबत चौकशी व्हावी, डॉक्टर परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तत्काळ कराव्यात, अशी मागणी केली.

या आंदोलनात माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाप्रमुख प्रसाद गावडे, आप्पा मांजरेकर, सचिन तावडे, चंदन मेस्त्री, गुरुदास गवंडे, विनोद सांडव, दत्ताराम बिडवडकर, आदी पदाधिकाऱ्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

विविध १५ मागण्या सादर

या व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, व नर्सला, आठवड्यातून किमान एक दिवस आरामासाठी सुटी देण्यात यावी, कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी साधनसामग्री पुरवावी, उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक हे बदल्या व भरती प्रक्रिया करित असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करावी.

तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात, रुग्णांना चांगल्या प्रकारचे जेवण देण्यात यावे, रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ सुरू करावे. जिल्ह्यात रुग्णालयासाठी खरेदी होणारी साधन सामुग्री या जिल्ह्यातूनच खरेदी करावी, बाहेरच्या जिल्ह्यातून बंद करावी, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील सफाई करण्याच्या प्राप्त झालेल्या कमी दराच्या निविदा नाकारून चढत्या दराने एका ठेकेदाराला मंजूर केलेल्या निवेदनात रद्द करण्यात याव्यात, व फेरनिविदा काढण्यात यावेत, यासह विविध १५ मागण्यां या आज आंदोलनाच्या माध्यमातून मनसेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

पोलीस छावणीचे स्वरूप

जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले. जिल्हा रुग्णालय परिसर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे आज जिल्हा रुग्णालयात पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

देवदूतांना मानाचा मुजरा

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात अनेक मुद्दे घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जनआक्रोश आंदोलन छेडले जात असतानाच व भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच एकीकडे जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. नागेश पवार या सिंधुदुर्ग रुग्णालयातील हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोना मुक्त करणाऱ्या देवदूतांना मालवण येथील जेष्ठ नागरिक नाना पारकर यांनी मानाचा मुजरा करत त्यांचे अभिनंदन केल्याचे याच गेटवर भला मोठा बॅनर जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर झळकत आहे. हा बॅनर मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Web Title: MNS's Janakrosh Andolan, the chaotic management of the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.